अनुपमाचं जबरदस्त ज्वेलरी कलेक्शन! लग्नसमारंभात कशी ज्वेलरी घालावी हे सुचत नसेल तर तिचे १० लूक बघाच..

Published:December 15, 2022 06:02 PM2022-12-15T18:02:41+5:302022-12-15T18:20:13+5:30

अनुपमाचं जबरदस्त ज्वेलरी कलेक्शन! लग्नसमारंभात कशी ज्वेलरी घालावी हे सुचत नसेल तर तिचे १० लूक बघाच..

१. अनुपमा ही मालिका जेवढी गाजते आहे, तेवढीच चर्चा अनुपमा म्हणजेच रुपाली गांगुली या नायिकेने त्या मालिकेत घातलेल्या साड्यांची आणि दागिन्यांचीही होते. अनुपमाचे फेस्टिव्ह लूक (Anupama's 10 most attractive festive looks) खरोखरच बघण्यासारखे असतात.

अनुपमाचं जबरदस्त ज्वेलरी कलेक्शन! लग्नसमारंभात कशी ज्वेलरी घालावी हे सुचत नसेल तर तिचे १० लूक बघाच..

२. सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे वेगवेगळ्या साड्यांवर किंवा कपड्यांवर कशी ज्वेलरी घालायची हा प्रश्न पडतोच. त्यासाठी काही आयडिया पाहिजे असतील तर अनुपमाचे हे काही लूक बघाच. कोणत्या रंगाच्या साडीवर कशा पद्धतीचे दागदागिने उठून दिसतात, याची चांगली आयडिया तिचे फोटो पाहून येऊ शकते.

अनुपमाचं जबरदस्त ज्वेलरी कलेक्शन! लग्नसमारंभात कशी ज्वेलरी घालावी हे सुचत नसेल तर तिचे १० लूक बघाच..

३. कधी कधी अशी हेवी ज्वेलरी घालायला आपल्याला नको वाटते. पण लग्नसमारंभात असे मोठे दागिनेही चांगले उठून दिसतात. आपल्या गेटअपला आणखी खास लूक देतात.

अनुपमाचं जबरदस्त ज्वेलरी कलेक्शन! लग्नसमारंभात कशी ज्वेलरी घालावी हे सुचत नसेल तर तिचे १० लूक बघाच..

४. गळ्यात वर छोटं मंगळसूत्र आणि त्याच्या खाली असा लांब रुंद मोत्याचा कंठा असंही छान दिसतं. त्यासाठी तुमची साडी मात्र काठपदराची असावी.

अनुपमाचं जबरदस्त ज्वेलरी कलेक्शन! लग्नसमारंभात कशी ज्वेलरी घालावी हे सुचत नसेल तर तिचे १० लूक बघाच..

५. महाराष्ट्रीयन वेशभुषा केली असेल तर अशा पद्धतीने वेगळ्या धाटणीचे दागिनेही तुम्ही निवडू शकता.

अनुपमाचं जबरदस्त ज्वेलरी कलेक्शन! लग्नसमारंभात कशी ज्वेलरी घालावी हे सुचत नसेल तर तिचे १० लूक बघाच..

६. मोत्याचे चोकर सध्या खूप ट्रेण्डिंग आहेत. अशा पद्धतीचे मोठे पेंडंट असणारे चोकरी साडी तसेच लेहेंगा- घागरा यावरही शोभून दिसेल.

अनुपमाचं जबरदस्त ज्वेलरी कलेक्शन! लग्नसमारंभात कशी ज्वेलरी घालावी हे सुचत नसेल तर तिचे १० लूक बघाच..

७. मोत्याच्या चोकरमध्ये अनुपमाने अनेक वेगवेगळे रंग ट्राय केले आहेत. तिचं हे गर्द हिरवं गळ्यातलंही अनेकांना आवडलं होतं.

अनुपमाचं जबरदस्त ज्वेलरी कलेक्शन! लग्नसमारंभात कशी ज्वेलरी घालावी हे सुचत नसेल तर तिचे १० लूक बघाच..

८. त्याच पद्धतीचं हे ग्रे रंगाचं गळ्यातलंही तुम्ही एखाद्या साडीवर- लेहेंग्यावर ट्राय करू शकता. तेच एवढं हेवी होतं की दुसरं काही घालण्याची गरजच नाही.

अनुपमाचं जबरदस्त ज्वेलरी कलेक्शन! लग्नसमारंभात कशी ज्वेलरी घालावी हे सुचत नसेल तर तिचे १० लूक बघाच..

९. एखादं नाजूक मोत्याचं चोकर बघत असाल तर अशा पद्धतीचं ट्राय करून पाहू शकता. सर्वच वयोगटातील महिलांना हे सूट होईल. शिवाय डिझाईनही अगदी नाजूक आहे.

अनुपमाचं जबरदस्त ज्वेलरी कलेक्शन! लग्नसमारंभात कशी ज्वेलरी घालावी हे सुचत नसेल तर तिचे १० लूक बघाच..

१०. पारंपरिक काठपदर साड्यांवर गोल्ड प्लेटेड ज्वेलरी किंवा सोनेरी रंगातलं काही घालण्याचा विचार करत असाल, तर अशा पद्धतीच्या दागिन्यांची निवडही करू शकता.