Join us

वटपौर्णिमा 2025 : नव्याकोऱ्या साडीची मोडा वटपौर्णिमेला घडी, पाहा लेटेस्ट सुंदर साड्या! दिसाल नव्या नवरीसारख्या देखण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2025 18:41 IST

1 / 7
महाराष्ट्रातील अनेक भागात आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि प्रगतीसाठी वटपौर्णिमेचा व्रत केला जातो. यादिवशी स्त्रिया सांजश्रृंगार करुन वडाच्या झाडाची पूजा करतात. (Vat Purnima 2025 saree looks like bridal)
2 / 7
वटपौर्णिमेच्या दिवशी नवीन साडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या रंगाच्या आणि पॅटर्नच्या साड्या नक्की ट्राय करुन पाहा. (Bridal style saree for Vat Savitri puja)
3 / 7
लाल रंगाची बनारसी रेशमी किंवा कांजीवरम रेशमी कापडाची साडी आपण नेसू शकतो. यावर आपण विविध ज्वेलरी देखील घालू शकतो.
4 / 7
चंदेरी प्रिंटेड साडी आपल्या सौंदर्यात भर घालेल. ही साडी पारंपरिक पद्धतीची असल्यामुळे आपल्यावर शोभून दिसेल.
5 / 7
पैठणी साडी नेसणार असाल तर यामध्ये विविध प्रकार पाहायला मिळतील. यात आपल्याला जरीची, बॉर्डरची साडी उपलब्ध आहे.
6 / 7
गोल्डन रंगाची साडी आपल्याला आकर्षक लूक देईल. यावर आपण त्याला शोभतील अशी ज्वेलरी परिधान करु शकतो.
7 / 7
शिफॉन साडीमध्ये आपण अधिक स्टायलिश आणि कूल दिसू. याचे फॅब्रिक चांगले असल्यामुळे आपल्या स्टाईलमध्ये अधिक भर पडेल.
टॅग्स : फॅशनमहिला