1 / 6ट्रॅडिशनल वेअरमध्ये भरपूर प्रकार आता उपलब्ध असतात. दर सणाला काही तरी वेगळी फॅशन मुली फॉलो करतात. मात्र कोणताही सण असो सगळ्यात आधी साडीचाच विचार डोक्यात येतो. 2 / 6साडीत अनेक प्रकार असतात. साडी नेसायची पद्धतही वेगळी असते. विविध राज्यात विविध प्रकारे साडी नेसली जाते. मुळात साडी हा प्रकारच इतका भारी आहे की साडी नेसण्याच्या सगळ्याच पद्धती मस्त दिसतात. 3 / 6असाच एक सुंदर प्रकार सध्या फार ट्रेंडींग आहे. तो म्हणजे हाफ साडी. हाफ साडी हा पारंपरिक आणि सुंदर भारतीय पोशाख आहे, जो विशेषतः दक्षिण भारतात वापरला जातो. अनेक राज्यात कुमारवयीन मुली हा प्रकार सातत्याने वापरतात. 4 / 6स्कर्ट सारखा खालचा भाग, त्यावर ब्लाऊज, पदराऐवजी ओढणी असा हा पेहराव असून साडीपेक्षा नेसायला सोपा असतो. फक्त ओढणी लावायची विशिष्ट पद्धत असते. ती जमली की त्यात बाकी काही करायचे नाही. 5 / 6या साडीवर गजरा, छान झुमके, गळ्यालगत एखादा हार, हातात बांगड्या असा पारंपरिक पोशाख फारच सुंदर दिसतो. हा प्रकार यंदाच्या दिवाळीत नक्की नेसून पाहा. 6 / 6साडीपेक्षा हाफ साडीमध्ये वावरणे जास्त सोपे आहे. तसेच त्याचा लूकही बऱ्यापैकी वेगळा आहे. वजनालाही हाफ साडी अगदी हलकी असते. नेसायला पाच मिनिटे लागतात.