वर्ल्ड कप जिंकून आता स्मृती मानधना चढणार बोहल्यावर, चर्चा तिच्या लग्नाची आणि लव्हस्टोरीचीही!
Updated:November 3, 2025 13:24 IST2025-11-03T13:16:54+5:302025-11-03T13:24:16+5:30
Smriti mandhana and Palash mucchal love story , is our queen getting married soon? : स्मृती मानधना लवकरच करणार लग्न. कोण आहे बॉयफ्रेंड ?

अनेक रेकॉर्ड तोडणारी , जबरदस्त क्रिकेट खेळून देशाला कायम आघाडीवर ठेवणारी लोकप्रिय क्रिकेटपट्टू म्हणजे स्मृती मानधना. भारत विश्व विजेता झाला आत तिचाही मोलाचा वाटा आहे. स्मृतीचे फॅन्स फक्त भारतात नाही तर जगभरात आहेत.
स्मृती फक्त तिच्या खेळासाठीच नाही तर सौदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. एखाद्या मॉडेललाही मागे टाकेल इतकी सुंदर आहे. सध्या रेकॉर्डबरोबर अनेक तरुणांचे हृदयही स्मृतीने तोडले, लवकरच आपली ओपनर क्वीन लग्न करत आहे.
प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलचा भाऊ पलाश मुच्छल आणि स्मृती गेली काही वर्षे रिलेशनशिपमध्ये आहेत. पलाश एक उत्तम संगीतकार आहे. बॉलिवूडमध्येही त्याने काम केले आहे. तो मुळचा इंदौरचा आहे.
स्मृतीचे लग्न ठरले असून ती इंदौरची सून होणार असल्याचे आणि सांगलीत २० नोव्हेंबरला स्मृती लग्न करणार असल्याचे वृत्त अनेक माध्यमसंस्थांनी दिले आहे.
स्मृतीच्या प्रत्येक यशानंतर पलाश तिचे कौतुक करताना दिसतो. एका मुलाखतीत स्मृती माझ्यासाठी खास आहे असेही तो म्हणाला होता. तसेच तिच्याबद्दल पलाशला आदर आहे असेही त्याने सांगितले.
कार्यक्रमांदरम्यान भेट झाली. नंतर संवाद सुरु झाला पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि आता नात्याला नवे वळण मिळणार आहे. स्मृती लवकरच इंदौरची सून होणार आहे. अजून विविध माध्यमांकडून ही खबर मिळत असली तरी स्मृतीने अजून काही मोकळेपणाने सांगितले नाही.