1 / 6शाहरुख खान आपल्या अभिनयासोबतच त्याच्या विचारांनी, विनोदी स्वभावासाठी आणि जीवनाबद्दलच्या दृष्टिकोनामुळेही लोकप्रिय आहे. त्याने अनेकदा मुलाखतींमध्ये आणि भाषणांमध्ये काही सुंदर, विचार मांडले आहेत. त्याची काही वाक्ये फार मार्गदर्शनपर आहेत. 2 / 6१. इतरांपेक्षा वेगळा विचार करत असाल तर त्याची भीती बाळगू नका. हाच गुण तुम्हाला गर्दीत उभे न करता सगळ्यांपेक्षा उच्च पदावर जाण्यास मदत करतो. 3 / 6२. यशापेक्षा अपयश जास्त काही शिकवून जाते. त्यामुळे अपयशाची भीती मनातून काढून टाका. त्याला स्वीकारायला शिका. 4 / 6३. आयुष्य तेव्हाच खऱ्या अर्थाने सुरू होतं, जेव्हा तुम्ही स्वत:ला तसेच स्वीकारता जसे तुम्ही आहात.5 / 6४. सर्वज्ञानी असणं किंवा सगळं काही माहित असणं आवश्यक नाही, पण दररोज काहीतरी नवीन शिकत राहणं महत्त्वाचं आहे.6 / 6५. एखाद्या कार्यात अडथळे आले किंवा अपयश आले तर त्यावर एकच औषध आहे, पुन्हा नव्याने त्याच कार्याच्या मागे लागा. सोडून देऊ नका.