तुम्हाला माहिती आहे का, कोण आहेत सर्वाधिक श्रीमंत भारतीय महिला क्रिकेटर्स? पाहा नावं आणि एकूण संपत्ती
Updated:November 4, 2025 16:17 IST2025-11-04T15:52:55+5:302025-11-04T16:17:37+5:30
Do you know who are the richest Indian women cricketers? See the names and net worth : भारतीय महिला क्रिकेटर्स ज्या आहेत श्रीमंत. पाहा त्यांची नेटवर्थ.

एकेकाळी हजार रुपयांवर खेळणाऱ्या महिला क्रिकेटर्सचे आता सुगीचे दिवस आले आहेत, असे म्हणायला हरकत नाही. काही महिला क्रिकेटर्स आता करोडपती आहेत ते ही फक्त त्यांच्या खेळासाठी.
मिताली राजने जेव्हा क्रिकेट खेळायला सुरवात केली तेव्हा त्यांना धड कपडेही दिले जात नव्हते, मात्र आज मिताली सगळ्यात श्रीमंत भारतीय महिला क्रिकेटर आहे. ४० ते ५० करोड एवढी तिची नेटवर्थ आहे.
स्मृती मानधना ही फारच लोकप्रिय आणि प्रसिद्ध खेळाडू आहे. स्मृती खेळायला लागल्यापासून ती कायमच चांगले खेळ प्रदर्शन करत आली आहे. WPL सारख्या इव्हेंट्समध्येही तिची चर्चा असते. ती वर्षाला जवळपास ५० लाख कमवते. तिची नेटवर्थ ३० ते ४० करोड आहे.
सेमी फायनल्स गाजवणारी जेमिमा रोड्रिग्सही श्रीमंत महिला क्रिकेटर्सच्या यादीत आहे. जेमिमाची नेटवर्थ सुमारे १० ते १५ कोटी आहे. ती एक सोशल मिडिया स्टारही आहे. तसेच WPL मध्येही चर्चेत असते.
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर एक यशस्वी खेळाडू आहे. तिची नेटवर्थ २५ करोड एवढी असून, WPL मध्ये तिला जवळपास १ कोटी मिळतात.
दिप्ती शर्मा एक नामांकित खेळाडू आहे. WPLमध्ये तिची चर्चा मोठ्या प्रमाणावर असते. तिची निवड करण्यासाठी संघ कायमच उत्सुक असतात. त्यामुळे ७ ते ८ कोटी एवढी नेटवर्थ दिप्तीची आहे.