By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 18:33 IST
1 / 10चेहरा काळा पडण्याची किंवा त्वचेचा रंग बदलण्याची अनेक कारणं असू शकतात. त्याची प्रमुख १० कारणं खालीलप्रमाणे आहेत. (Why Skin Gets Tanned Easily)2 / 10 उन्हात जास्त वेळ फिरल्यामुळे त्वचेमध्ये मेलेनिनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे त्वचा काळवंडते.3 / 10हवेतील धूळ, धूर आणि प्रदूषणामुळे त्वेच्या छिद्रांमध्ये साण साचते. ज्यामुळे चेहरा निस्तेज आणि काळा दिसू लागतो.4 / 10शरीरात पाणी कमी असल्यास त्वचा कोरडी पडते आणि तिची नैसर्गिक चमक हरवते ज्यामुळे चेहरा काळा वाटू लागतो.5 / 10स्त्रियांमध्ये गर्भधारणा, मेनोपॉझ किंवा पीसिओडीमुळे हॉर्मोनल बदल होतात. ज्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग पडतात.6 / 10सतत जागरण आणि तणावामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात आणि संपूर्ण चेहरा थकलेला आणि काळा दिसतो.7 / 10 स्वस्त किंवा केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनं वापरल्यामुळे त्वचेवर विपरीत परिणाम होऊन त्वचा काळी पडू शकते8 / 10यकृताचे आजार किंवा रक्ताची कमतरता असल्यास त्याचा परिणाम थेट चेहऱ्याच्या रंगावर होतो.9 / 10काही विशिष्ट औषधांच्या उष्णतेमुळे किंवा रिएक्शनमुळे त्वचेवर काळेपणा येऊ शकतो.10 / 10आहारात जीवनसत्व, एंटी ऑक्सिडेंट्सची कमतरता असल्यास त्वचा काळवंडते.