vat purnima 2025 : वटपौर्णिमेची पूजा करताना दिसाल सगळ्यात सुंदर! करा टोमॅटोचा 'हा' जादुई उपाय
Updated:June 6, 2025 18:00 IST2025-06-06T13:46:38+5:302025-06-06T18:00:12+5:30

बहुतांश महिला मोठ्या हौशीने अगदी नटूनथटून वडाची पूजा करतात (Vat Pournima 2025). आता या दिवशी छान दिसायचं असेल तर आपल्या चेहऱ्यालाही फेशियल, क्लिनअप करून छान तयार करायला हवं.(home made face pack for instant glowing skin)
अनेक जणींना त्यासाठी पार्लरमध्ये जायला वेळ मिळत नाही. किंवा मग पार्लरमध्ये जाऊन एवढा जास्त पैसा खर्च करण्याची इच्छा नसते. म्हणूनच तर आता फक्त १५ मिनिटांचा एक सोपा उपाय पाहा. हा उपाय केल्याने तुमच्या चेहऱ्यावर अगदी ब्लीच केल्याप्रमाणे गोल्डन ग्लो येईल.(how to do bleach at home?)
हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये २ चमचे टोमॅटोचा रस घ्या.
त्यामध्ये १ चमचा बटाट्याचा रस घाला. बटाट्याचा रस टॅनिंग कमी करण्यासाठी मदत करतो.
आता त्यामध्येच १ चमचा लिंबाचा रस आणि २ चमचे तांदळाचं पीठ घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या.
आता हा लेप तुमच्या चेहऱ्याला लावा. मानेला, गळ्यालाही तुम्ही लावू शकता. यानंतर १५ मिनिटांनी हळूवारपणे चेहऱ्याला मसाज करत लेप काढून घ्या.
यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्या. टॅनिंग कमी होऊन त्वचा छान फ्रेश आणि चमकदार दिसेल.