1 / 7पपई खाण्याचे कित्येक फायदे आपल्याला माहितीच आहेत. पण पपईच्या पानांचा लेपही अतिशय गुणकारी असतो.(use of papaya leaf for glowing skin)2 / 7त्वचेच्या कित्येक समस्या कमी करण्यासाठी पपईची पानं खूप उपयुक्त ठरतात.(how to use papaya leaf for reducing dark spots and pigmentation?)3 / 7हल्ली पिगमेंटेशन किंवा डार्क स्पॉट्स अशा त्वचेच्या तक्रारी वाढल्या आहेत. या काळपट डागांमुळे मग चेहराही कसातरीच दिसतो. म्हणूनच हे डाग नैसर्गिकपणे कमी करण्यासाठी एक अगदी स्वस्तात मस्त उपाय म्हणजे पपईची पानं.4 / 7पपईची काही ताजी पानं घ्या. त्यांचे बारीक तुकडे करा आणि थोडंसं पाणी घालून त्यांची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्या. 5 / 7त्यानंतर ही पेस्ट गाळून घ्या आणि त्या पाण्यामध्ये १ चमचा बेसन, १ चमचा मध घालून त्याचा लेप करा.6 / 7हा लेप चेहऱ्याला लावा. १० ते १२ मिनिटांनी लेप सुकत आल्यानंतर तो हाताने चोळून काढून टाका आणि चेहरा स्वच्छ धुवून घ्या.7 / 7हा उपाय नियमितपणे केल्यास पिगमेंटेशन, डार्क सर्कल्स तर कमी होतीलच, पण टॅनिंग आणि डेडस्किन कमी झाल्याने चेहराही फ्रेश वाटेल.