Join us

सिगारेट प्यायल्याने महिल्यांच्या चेहऱ्यावर ‘असे’ बदल दिसतात, वाढतो पिगमेंटेशनचाही धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2025 20:05 IST

1 / 10
आजकाल बऱ्याच लोकांना धुम्रपानाचे व्यसन लागले आहे. यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण हे महिलांचे आढळून आलेय. (smoking side effects in women)
2 / 10
धुम्रपानामुळे कॅन्सर, फुफ्फुसाचे आजार, स्ट्रोक आणि इतर गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. (smoking side effects in skin)
3 / 10
परंतु, जर तुम्ही सतत धूम्रपान करत असाल तर त्याचा आपल्या शरीरावरच नाही तर त्वचेवर देखील गंभीर परिणाम पाहायला मिळतो.
4 / 10
धूम्रपान केल्यामुळे त्वचेवर अनेक नकारात्मक परिणाम होतात. ज्यामुळे त्वचेची चमक कमी होते. तसेच लवकर वृद्धत्व येण्याची समस्या असते.
5 / 10
सिगारेटच्या धुरातील रसायनामुळे महिलांच्या त्वचेतील कोलेजन आणि इलास्टिनला नुकसान होते, ज्यामुळे त्वचा निस्तेज होऊन सुरकुत्या पडतात.
6 / 10
धूम्रपानामुळे शरीरातील रक्तप्रवाह कमी होतो, ज्यामुळे त्वचेला आवश्यक पोषक तत्वे आणि ऑक्सिजन मिळत नाही.
7 / 10
धुम्रपानामध्ये असणारे निकोटीन त्वचेत सहज प्रवेश करतो. तर शरीरातील केराटिनोसाइट्स पेशींना नुकसान पोहोचवते, ज्यामुळे त्वचा काळवडते.
8 / 10
धुम्रपान केल्यामुळे मृत त्वचेच्या पेशी वाढतात. ज्यामुळे त्वचेची चमक कमी होऊन त्वचा निस्तेज आणि थकलेली दिसू शकते.
9 / 10
सिगारेटच्या धुरामध्ये विषारी रासायन पदार्थ असतात, ज्यामुळे शरीरात ऑक्सिडेटिव्ह ताण निर्माण होतो. यामुळे मुक्त रॅडिकल्स त्वचेवर परिणाम करुन ती खराब करण्याचा प्रयत्न करतात.
10 / 10
धुमपानामुळे सोरायसिससारखे गंभीर आजार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यात असणाऱ्या निकोटीनमुळे रोगप्रतिकारक शक्तीवर आणि त्वचेच्या पेशींच्या वाढीवर परिणाम होतो.
टॅग्स : ब्यूटी टिप्सआरोग्यत्वचेची काळजी