मान्सून स्पेशल ७ फेसपॅक, तेलकट-चिपचिपी त्वचा आणि ग्लोईंग स्किनसाठी झटपट उपाय!

Published:July 18, 2022 02:27 PM2022-07-18T14:27:22+5:302022-07-18T14:57:13+5:30

मान्सून स्पेशल ७ फेसपॅक, तेलकट-चिपचिपी त्वचा आणि ग्लोईंग स्किनसाठी झटपट उपाय!

१. पावसाळ्यात तेलकट त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण या दिवसांत असणाऱ्या दमट हवामानामुळे तेलकट त्वचा आणखीनच चिकट आणि चिपचिपीत दिसू लागते.

मान्सून स्पेशल ७ फेसपॅक, तेलकट-चिपचिपी त्वचा आणि ग्लोईंग स्किनसाठी झटपट उपाय!

२. त्वचेवरचं तेल आणखी वाढलं की मग पिंपल्स, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्सचा त्रास होऊ लागतो. म्हणूनच हा त्रास कमी करण्यासाठी हे काही मान्सून स्पेशल फेसपॅक लावून बघा.

मान्सून स्पेशल ७ फेसपॅक, तेलकट-चिपचिपी त्वचा आणि ग्लोईंग स्किनसाठी झटपट उपाय!

३. हे फेसपॅक लावण्यासाठी आपल्याला बाजारात जाऊन कोणतीही खरेदी करण्याची गरज नाही. जवळपास या सगळ्याच वस्तू आपल्या घरात असतातच. त्यांचाच वापर करून आपल्याला हे होममेड फेसपॅक बनवायचे आहेत. पुढील काही उपायांपैकी जो उपाय तुम्हाला अधिक सोयीस्कर, सोपा वाटेल तो करून बघा.

मान्सून स्पेशल ७ फेसपॅक, तेलकट-चिपचिपी त्वचा आणि ग्लोईंग स्किनसाठी झटपट उपाय!

४. सगळ्यात पहिला फेसपॅक म्हणजे चंदन आणि गुलाब पाणी. चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी मिक्स करा आणि त्याचा लेप त्वचेवर लावा. हा लेप सुकला की चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. पिंपल्सचा त्रास होत असल्यास हा उपाय खूपच गुणकारी ठरतो.

मान्सून स्पेशल ७ फेसपॅक, तेलकट-चिपचिपी त्वचा आणि ग्लोईंग स्किनसाठी झटपट उपाय!

५. त्वचा काळवंडली असेल तर हा एक उपाय करून बघा. दही, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ हे सगळं सम प्रमाणात घ्या. चेहरा थोडा ओलसर करा. त्यानंतर हा लेप चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने चेहरा चोळा. यामुळे त्वचेवरचा मळ निघून जाईल. काळवंडलेपणा दूर होईल आणि त्वचा स्वच्छ दिसू लागेल.

मान्सून स्पेशल ७ फेसपॅक, तेलकट-चिपचिपी त्वचा आणि ग्लोईंग स्किनसाठी झटपट उपाय!

६. त्वचा टाईटनिंगसाठी हा उपाय चांगला आहे. यासाठी मुलतानी माती काकडीचा रस टाकून भिजवा आणि चेहऱ्यावर लावा. सुकेपर्यंत हा लेप चेहऱ्यावर राहू द्या. त्वचेचा सैलसरपणा कमी होऊन त्वचा अधिक तरुण दिसू लागेल.

मान्सून स्पेशल ७ फेसपॅक, तेलकट-चिपचिपी त्वचा आणि ग्लोईंग स्किनसाठी झटपट उपाय!

७. त्वचेवर ग्लो आणण्यासाठी हळद आणि मध एकत्र करून लावलेला फेसपॅक अधिक उपयुक्त ठरेल.

मान्सून स्पेशल ७ फेसपॅक, तेलकट-चिपचिपी त्वचा आणि ग्लोईंग स्किनसाठी झटपट उपाय!

८. लिंबाचा रस त्वचेचं टॅनिंग दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतो. म्हणूनच लिंबाचा रस, दही आणि मध हे एक सुपर कॉम्बिनेशन लावून बघा.

मान्सून स्पेशल ७ फेसपॅक, तेलकट-चिपचिपी त्वचा आणि ग्लोईंग स्किनसाठी झटपट उपाय!

९. टोमॅटोमध्ये असणारे घटक चेहऱ्यावरचे काळे डाग कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. हा उपाय करण्यासाठी १ टेबलस्पून टोमॅटोचा रस, १ टीस्पून मध आणि २ टीस्पून गुलाब पाणी हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्यावर लावा. ५ ते ७ मिनिटांसाठी हलक्या हाताने मसाज करा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका.

मान्सून स्पेशल ७ फेसपॅक, तेलकट-चिपचिपी त्वचा आणि ग्लोईंग स्किनसाठी झटपट उपाय!

१०. पपईचा गर आणि चंदन पावडर हा एक आणखी छान आणि सोपा उपाय आहे. पपईमध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि ए तसेच चंदनाची शितलता या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे त्वचेचे खूप छान पोषण करतात.