1 / 6दीपिका पादुकोणचं सौंदर्य आपल्याला तिच्या प्रत्येक चित्रपटामधूनच दिसून येतं. अभिनेत्री असल्याने ती सौंदर्य जपण्यासाठी महागडे कॉस्मेटिक्स वापरत असणार यात काही वाद नाहीच..2 / 6पण तरीही ती आतून स्वत:चं आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्वचेचं तारुण्य, सौंदर्य जपण्यासाठी काही गोष्टी आवर्जून करते अशी माहिती तिच्या आहारतज्ज्ञ श्वेता शाह यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.3 / 6श्वेता शाह यांनी जी पोस्ट शेअर केली आहे त्यानुसार दीपिका रोज एक खास ज्यूस पिते आणि त्यामुळेच तिची त्वचा जास्त सुंदर, चमकदार, तेजस्वी दिसते.4 / 6यासाठी दीपिका दररोज सकाळी बीटचा ज्यूस घेते. पण त्यामध्ये आणखीही काही पदार्थ असतात. त्यापैकी एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मुठभर कोथिंबीर..5 / 6हा ज्यूस करण्यासाठी बीटरुट लहान आकाराचे घेऊन त्याचे काप करा. त्यासोबतच कोथिंबीरही चिरून घ्या. यामध्येच आता ७ ते ८ कडुलिंबाची पाने आणि १० ते १२ कढीपत्त्याची पाने घाला. हे सगळे पदार्थ मिक्सरमधून बारीक वाटून घ्या आणि नंतर ते गाळून घ्या.6 / 6आता या रसामध्ये आणखी थोडं पाणी घालून ते प्यावं. दीपिकाने हा उपाय जवळपास ३ महिने सलग केला होता असं तिच्या आहारतज्ज्ञ सांगतात.