1 / 9वर्षानुवर्षे चालत आलेल्या घरगुती उपायांचा नक्कीच कायम फायदा होतो. नैसर्गिक वस्तूंचा वापर करणे शरीरासाठी, आरोग्यासाठी फार उपयुक्त ठरते. औषधी झाडांचा, पाल्याचा वापर आपण करतो. त्याचा गुणही चांगला येतो.2 / 9अनेक विविध वनस्पती आहेत ज्यांना आयुर्वेदामध्ये फार महत्व आहे. झाडांना, पानांना, फुलांना तसेच खोडांना आयुर्वेदामध्ये महत्व आहे. त्यामध्ये चंदनाचा समावेश होतो. घरोघरी चंदन असते. आपण ते देवकार्यासाठी वापरतो. मात्र चंदन औषधी असते.3 / 9चंदनाचा गंध फार मनमोहक असतो त्याच प्रमाणे त्याचे आरोग्यदायी फायदेही अनेक आहेत. चंदनाची पूड मिळते तिचा वापर वरचेवर करायला काहीच हरकत नाही. 4 / 9अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये चंदनाचा वापर केला जातो. चंदन त्वचेसाठी फार फायदेशीर ठरते. त्यामुळे चंदनाचा लोप चेहर्याला लावणे गुणकारी ठरते. त्वचा ताजीतवानी होते आणि उजळतेही.5 / 9उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तसेच हिवाळ्यातही त्वचेची जळजळ होते. वातावरणामुळे त्वचेवर रॅश उठतात. सारखी खाजही सुटते. त्वचेला चंदनाचा लेप लावल्याने जळजळ, खाज बंद होते. 6 / 9चंदन अँण्टी सेफ्टीक असते. त्यामुळे चंदन लावल्याने मुरूम गायब होतात. तसेच त्वचेवर उठणारी फोडंही गायब होतात. पिंपल्स येत नाहीत. इतरही चेहर्यावरील घाण नाहीशी होते. 7 / 9चंदनामध्ये नैसर्गिक थंडावा असतो. शरीरातील उष्णतेचे प्रमाण कमी करण्यासाठी चंदन उपयुक्त ठरते. 8 / 9त्वचेवरील काळे डाग चंदनामुळे कमी होतात. तसेच कमी झोपेमुळे किंवा तणावामुळे डोळ्याखाली डार्क सर्कल्स उठतात. ते ही चंदनामुळे बरे होतात.9 / 9 घाम तर सगळ्यांनाच येतो. मात्र काहींना घाम आला की दुर्गंधी येते. चंदनाचा वापर केल्याने घामाला दुर्गंधी येत नाही. परफ्यूमची गरजच नाही. चंदनामुळे त्वचेला छान वास येतो.