हेअर फॉलचा वैताग! लसूण की कांद्याचा रस... काळ्याभोर लांब, जाड केसांसाठी सर्वात बेस्ट काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 16:42 IST
1 / 8प्रत्येकाला लांब, जाड आणि मजबूत केस हवे असतात. मात्र धूळ, प्रदूषण, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि स्ट्रेसमुळे केस गळती वाढते. अशा परिस्थितीत, घरगुती उपायांचा वापर सर्वोत्तम मानला जातो. 2 / 8लसूण आणि कांद्याचा रस केसांसाठी विशेषतः फायदेशीर मानला जातो. दोन्ही गोष्टी केसांसाठी उत्कृष्ट आहेत, परंतु लोक अनेकदा विचार करतात की केसांसाठी सर्वात बेस्ट काय त्याबाबत जाणून घेऊया....3 / 8कांद्याचा रस केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. तो केस गळती रोखण्यास आणि केस जाड करण्यास मदत करतो. कांद्यामध्ये सल्फरचं प्रमाण जास्त असतं, जे केसांची मुळं मजबूत करतं आणि नवीन केसांची वाढ होते. 4 / 8कांद्याचा रस स्काल्पवर ब्लड सर्क्युलेशन वाढवतो, ज्यामुळे केसांना आवश्यक पोषण मिळते. अशा परिस्थितीत, आठवड्यातून २ ते ३ वेळा कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळणे कमी होते आणि त्यांना नैसर्गिक चमक मिळते. ते हळूहळू पांढरे होणारे केस काळे करण्यास देखील मदत करते.5 / 8लसूण केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. लसूण केसांची मुळे मजबूत करण्यास मदत करतं. हे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्मांनी समृद्ध आहे, जे स्काल्पचं इन्फेक्शनपासून संरक्षण करतं. ते हेअर फॉलिकल्स देखील स्वच्छ करतं आणि नवीन सेल्सच्या निर्मितीला प्रोत्साहन देतं. 6 / 8लसणाचा रस नारळाच्या तेलात किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून लावल्याने स्काल्पवरची जळजळ कमी होते आणि केसांची मुळं मजबूत होतात. यामुळे केस गळणं थांबतं आणि खराब झालेले केस पुन्हा मजबूत होण्यास मदत होते.7 / 8कांदा किंवा लसणाचा रस दोन्हीही आपापल्या पद्धतीने प्रभावी आहेत. जर तुम्हाला केस लवकर वाढवायचे असतील तर कांद्याचा रस अधिक प्रभावी आहे. 8 / 8जर तुम्हाला डोक्यातील कोंडा किंवा स्काल्पच्या इन्फेक्शनपासून मुक्तता हवी असेल तर लसणाचा रस अधिक फायदेशीर ठरेल. केसांची नीट काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.