Join us   

Malaika Arora Beauty Secret : मलायका अरोराच्या नितळ त्वचेचं सिक्रेट; रोज करते ३ घरगुती उपाय, ४८ व्या वर्षीही दिसते सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 12:28 PM

1 / 9
अभिनेत्री मलायका अरोराच्या (Malaika Arora) वाढत्या वयाचा प्रभाव कधीच तिच्या त्वचेवर दिसून येत नाही. तिची त्वचा अशी चमकते की वयाच्या ४८ व्या वर्षीही नव्या तारकांची चमक तिच्यासमोर फिकी पडते. यामुळेच प्रत्येक मुलीला अशी नितळ त्वचा हवी असते. मलायका तिच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी विविध घरगुती उपाय वापरते, त्यापैकी काही इतके सोपे आणि स्वस्त आहेत की तुम्ही आजपासूनच तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये समाविष्ट करू शकता. (Malaika arora simple diy home remedies to have glowing and acne free skin)
2 / 9
मलायका अरोरा मृत त्वचा काढून टाकण्यासाठी स्क्रब वापरते, जे ती स्वतः स्वयंपाकघरातील घटकांपासून घरी तयार करते. यासाठी मलायका प्रथम कॉफी पावडर घेते, त्यात ब्राऊन शुगर आणि नंतर तेल घालते. यामध्ये ती सहसा नारळ किंवा बदामाचे तेल मिसळते, असे अभिनेत्रीने सांगितले होते.
3 / 9
ब्राऊन शुगर उपलब्ध नसली तरी स्वयंपाकघरात असलेली सामान्य साखर वापरता येईल. हे होम स्क्रब त्वचेवर वर्तुळाकार गतीने घासावे लागते आणि नंतर पाण्याने धुवावे लागते. हे केवळ चेहऱ्यावरच नव्हे तर संपूर्ण शरीरावर वापरले जाऊ शकते.
4 / 9
मलायकाला त्वचेच्या समस्या उद्भवत नाहीत असे नाही. तिलाही मुरुमांच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे तिनं सांगितले. या त्वचेच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी ती दालचिनीचा फेस पॅक लावते. ते बनवण्यासाठी ती दालचिनी पावडर, एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून फेस पॅक बनवते. अभिनेत्री सुमारे 15 मिनिटे चेहऱ्यावर ठेवते आणि आठवड्यातून दोन-तीन वेळा पॅक लावते.
5 / 9
मलायका एलोवेरा जेलचा भरपूर वापर करते, त्यामुळे तिने त्याची रोपेही घरी ठेवली आहेत. तिनं शेअर केले होते, 'फक्त कोरफडीचा तुकडा घ्या, तो कापून घ्या आणि जेल काढा. चेहऱ्यावर लावा. काही वेळाने चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे दिवसभर चेहरा टवटवीत आणि नितळ राहील.
6 / 9
मलायका तिच्या चमकदार त्वचेसाठी आहार आणि व्यायामाची देखील काळजी घेते. यासोबतच ती त्वचा मुलायम ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर नक्कीच वापरते.
7 / 9
तिने चेहऱ्यावर कोणताही पॅक किंवा स्क्रब लावला तरी ते धुतल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझ करायला ती विसरत नाही.
8 / 9
मला नियमितपण योगासनं करते. त्यामुळे तिची त्वचा नेहमी टवटवीत दिसते. सोशल मीडियावर आपले फिटनेस व्हिडिओज ती चाहत्यांसह शेअर करत असते.
9 / 9
(All Image Credit- Social Media)
टॅग्स : ब्यूटी टिप्ससेलिब्रिटीसोशल मीडियामलायका अरोरा