By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 13:19 IST
1 / 10चेहऱ्याचा नैसर्गिक ग्लो आणि टवटवीतपणा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही रोजच्या रुटीनमध्ये काही सोपे बदल करू शकता. (How To Maintain Skin Glow)2 / 10शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढून टाकण्यासाठी आणि त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभरातून किमान ८ ते १० ग्लास पाणी प्या. (10 Tips To Maintain A Skin Glow)3 / 10दररोज ७ ते ८ तासांची झोप घ्या. यामुळे डोळ्यांखाली काही वर्तुळ कमी होतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळण्यास मदत होते.4 / 10 आहारात हिरव्या पालेभाज्या, फळं आणि ड्रायफ्रुट्सचा समावेश करा. व्हिटामीन सी युक्त फळं जसं की संत्री, लिंबू त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.5 / 10 दिवसातून दोनवेळा चांगल्या फेसवॉशनं चेहरा धुवा. ज्यामुळे धूळ आणि तेल निघून जाण्यास मदत होईल.6 / 10घराबाहेर पडताना नेहमी सनस्क्रीन लावा जेणेकरून सुर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचं सरंक्षण होईल.7 / 10 रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याचा मेकअप पूर्णपणे काढा आणि त्वचेला साजेसे मॉईश्चरायजर लावा.8 / 10नियमित व्यायाम केल्यानं रक्ताभिसरण सुधारतं ज्याचा थेट परिणाम चेहऱ्याचा ग्लो टिकवून ठेवण्यात होतो.9 / 10जास्त मानसिक ताणामुळे त्वचा निस्तेज दिसते. ज्यामुळे ध्यान किंवा आवडीच्या छंदात वेळ घालवा.10 / 10आठवड्यातून एकदा चेहऱ्याला कोरफड जेल किंवा बेसन-हळदीचा फेसपॅक लावल्यानं त्वचेचा पोत सुधारतो.