पायाचे घोटे, हात, मान काळी पडली? कॉफी घेऊन घरीच 'हे' क्रिम बनवा, टॅनिंग जाऊन त्वचा स्वच्छ
Updated:January 14, 2026 12:46 IST2026-01-14T12:39:51+5:302026-01-14T12:46:57+5:30

अंगावरचं टॅनिंग कमी करण्यासाठी घरातलंच साहित्य वापरून खूप उत्तम रिझल्ट मिळवून देणारं ॲण्टीटॅनिंग क्रिम तयार करता येतं.
हे क्रिम तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये १ चमचा कोणतंही टुथपेस्ट घ्या. टुथपेस्टमध्ये असणारे काही घटक आपल्या दातांप्रमाणेच त्वचा स्वच्छ करण्यासाठीही उपयुक्त ठरतात.
यानंतर त्यामध्ये थोडा लिंबाचा रस घाला. लिंबाचा रस त्वचेवर ब्लिचिंगप्रमाणे इफेक्ट देतो.
सगळ्यात शेवटी त्यामध्ये तुम्ही वापरत असणारा कोणताही शाम्पू १ चमचा घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या आणि त्यानंतर हे क्रिम तुमच्या काळ्या पडलेल्या अंगाला लावा. ५ मिनिटांनी चोळून चोळून अंग धुवून टाका. त्वचेवरचं टॅनिंग कमी झालेलं जाणवेल.
या क्रिमचा वापर चेहऱ्यासाठी मात्र करू नये. पायाचे घोटे, हाताचे कोपरे, मान, गुडघे स्वच्छ करण्यासाठी हे क्रिम उपयुक्त ठरते.