पावसाळ्यात अंगाला सारखी खाज येते- खाजवून जखमाही होतात? ५ उपाय- दरवर्षीचा त्रास गायब
Updated:July 8, 2025 16:29 IST2025-07-08T13:46:58+5:302025-07-08T16:29:30+5:30

पावसाळ्याच्या दिवसात बऱ्याचदा आपण पावसात भिजतो, अंगावर बराच वेळ ओले कपडे राहतात. शिवाय सगळीकडेच दमट, ओलसर वातावरण असते.
यामुळे मग ज्यांची त्वचा नाजूक असते त्यांना खूप त्रास होतो. अंग सतत खाजवतं (how to avoid constant skin itching during monsoon?). काही जणांना तर एवढी खाज येते की खाजवून खाजवून अंगावर बारीक जखमाही होतात. हा त्रास कमी कसा करायचा ते पाहूया..
जर तुम्ही पावसात भिजलात तर घरी आल्यानंतर नुसते कपडे बदलू नका. कोमट पाणी अंगावर घेऊन स्वच्छ आंघोळ करा. आंघोळीसाठी या दिवसांत एखादा माईल्ड साबण वापरावा.
आंघोळीच्या पाण्यात थोडा लिंबाचा रस आणि रॉक सॉल्ट घालून आंघोळ केल्यानेही अंगाला येणारी खाज बरीच कमी होते.
या दिवसांत खूप घट्ट कपडे घालू नयेत. सुती, सैलसर कपडे घाला. हे कपडे त्वचेसाठी चांगले असतात.
आठवड्यातून १ किंवा २ वेळा मोहरी किंवा तिळाचं तेल लावून अंगाला मालिश करा. यामुळे त्वचेला छान पोषण मिळून उबदार वाटेल.
रात्री झोपताना नाभीमध्ये २ थेंब साजूक तूप आणि २ थेंब खोबरेल तेल एकत्र करून घाला आणि हलकी मसाज करा. यामुळे शरीर आतून मॉईश्चराईज होऊन अंगावरची खाज कमी होण्यास मदत होईल.