चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो वाढवण्यासाठी दररोज किती पाणी प्यावं? डर्मेटोलॉजिस्टने दिलं अचूक उत्तर

Updated:December 10, 2025 18:19 IST2025-12-10T18:07:11+5:302025-12-10T18:19:21+5:30

आपण अनेकदा ऐकलं आहे की भरपूर पाणी प्या, तुमची त्वचा आपोआप चमकेल किंवा पाणी प्यायल्याने त्वचेवर नॅचरल ग्लो वाढतो. पण यासाठी नेमकं किती पाणी प्यावं लागतं असा प्रश्न हमखास पडतो.

चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो वाढवण्यासाठी दररोज किती पाणी प्यावं? डर्मेटोलॉजिस्टने दिलं अचूक उत्तर

आपण अनेकदा ऐकलं आहे की भरपूर पाणी प्या, तुमची त्वचा आपोआप चमकेल किंवा पाणी प्यायल्याने त्वचेवर नॅचरल ग्लो वाढतो. पण यासाठी नेमकं किती पाणी प्यावं लागतं असा प्रश्न हमखास पडतो.

चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो वाढवण्यासाठी दररोज किती पाणी प्यावं? डर्मेटोलॉजिस्टने दिलं अचूक उत्तर

प्रसिद्ध डर्मेटोलॉजिस्ट डॉ. जुशिया भाटिया सरीन यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी पाणी पिण्याबद्दल अचूक माहिती दिली आहे.

चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो वाढवण्यासाठी दररोज किती पाणी प्यावं? डर्मेटोलॉजिस्टने दिलं अचूक उत्तर

डॉ. जुशिया यांच्या मते, पाणी आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. ते आपल्या पेशींपर्यंत पोषक तत्वं पोहोचवण्यास मदत करतं आणि त्वचेला आतून निरोगी ठेवते.

चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो वाढवण्यासाठी दररोज किती पाणी प्यावं? डर्मेटोलॉजिस्टने दिलं अचूक उत्तर

जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता होते, तेव्हा त्वचा लगेच निस्तेज, कोरडी, ताणलेली आणि सुरकुत्या पडल्यासारखी दिसू लागते. त्यामुळे निरोगी त्वचेसाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे.

चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो वाढवण्यासाठी दररोज किती पाणी प्यावं? डर्मेटोलॉजिस्टने दिलं अचूक उत्तर

डॉक्टरांच्या मते, दररोज २ ते २.५ लीटर पाणी पिणं योग्य मानलं जातं. जर तुम्ही व्यायाम करत असाल, जास्त घाम गाळत असाल, तर तुम्ही ३ लिटरपर्यंत पाणी पिऊ शकता. यापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने कोणताही अतिरिक्त फायदा होणार नाही.

चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो वाढवण्यासाठी दररोज किती पाणी प्यावं? डर्मेटोलॉजिस्टने दिलं अचूक उत्तर

डॉक्टर एकाच वेळी जास्त पाणी न पिण्याचा सल्ला देतात. त्या म्हणतात, एकाच वेळी खूप पाणी प्यायल्यास शरीर त्याचा पुरेसा वापर करू शकत नाही. यामुळे तुम्हाला पोट फुगल्यासारखं वाटू शकतं आणि पाण्याचे अपेक्षित फायदेही मिळणार नाहीत.

चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो वाढवण्यासाठी दररोज किती पाणी प्यावं? डर्मेटोलॉजिस्टने दिलं अचूक उत्तर

डॉ. जुशिया सांगतात की, निरोगी आणि तेजस्वी त्वचेसाठी केवळ पाणी पिणं पुरेसं नाही. शरीर हायड्रेटेड असतानाही, तुमची त्वचा बाहेरून कोरडी आणि निर्जीव दिसू शकते. कारण, अनेकदा पाणी थेट त्वचेच्या वरच्या थरापर्यंत पोहोचत नाही.

चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो वाढवण्यासाठी दररोज किती पाणी प्यावं? डर्मेटोलॉजिस्टने दिलं अचूक उत्तर

जर त्वचेचं संरक्षक कवच कमकुवत असेल, तर शरीरातील पाणीही त्वचेतून बाहेर निघून जातं. अशा परिस्थितीत ज्यांची त्वचा खूप कोरडी आहे, त्यांना फक्त पाण्याची नव्हे, तर हेवी मॉइश्चरायझरचीही गरज असते.

चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो वाढवण्यासाठी दररोज किती पाणी प्यावं? डर्मेटोलॉजिस्टने दिलं अचूक उत्तर

कोरडी त्वचा ठीक करण्यासाठी पाणी पिण्यासोबतच चांगल्या मॉइश्चरायझरचा वापर करा. डॉक्टरांच्या मते, सेरामाइड-आधारित मॉइश्चरायझर कोरड्या त्वचेसाठी सर्वोत्तम असतात, कारण ते त्वचेचा संरक्षक कवच मजबूत करतात.

चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो वाढवण्यासाठी दररोज किती पाणी प्यावं? डर्मेटोलॉजिस्टने दिलं अचूक उत्तर

याव्यतिरिक्त आहाराकडेही लक्ष द्या. पोषणयुक्त गोष्टी खा, सनस्क्रीन लावा आणि दररोज किमान ८ तासांची झोप घ्या. तेव्हाच तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक दिसेल आणि त्वचा निरोगी राहील.