Join us

वाढत्या उष्णतेमुळे लहान मुलांनाही घामोळ्यांचा त्रास? ५ घरगुती उपाय- जळजळ थांबून मिळेल आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2025 09:25 IST

1 / 7
सध्या उष्णता खूप वाढली आहे. त्यामुळे मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांनाही घामोळ्या येण्याचा त्रास होत आहे.(5 tips to get rid of ghamoriya in summer)
2 / 7
घामोळ्या आल्या की त्या भागात खूप खाज येते. त्यामुळे मग बऱ्याचदा तिथे खाजवले जाऊन जखमाही होतात. लहान मुलांना तर त्याचा जरा जास्तच त्रास होतो. म्हणून हे काही सोपे उपाय बघा. यामुळे घामोळ्यांचा त्रास कमी होण्यास निश्चितच मदत होऊ शकते.(home remedies for the heat rash in summer season)
3 / 7
पहिला उपाय म्हणजे ज्या भागात घामोळ्या आलेल्या आहेत तो भाग कोरडा ठेवा. यासाठी त्या भागावर दिवसातून ३ - ४ वेळा टाल्कम पावडर किंवा बाजारात मिळणाऱ्या घामोळ्यांसाठीच्या पावडर टाका. सुती, तलम कपडे घाला आणि जास्त घाम येणार नाही याची काळजी घ्या.
4 / 7
कडुलिंबाची पाने उकळून घ्या आणि त्या पाण्याने अंघोळ करा. किंवा ज्या ठिकाणी घामोळ्या आहेत तो भाग कडुलिंबाच्या पाण्याने धुवून घ्या. घामोळ्या कमी होतील.
5 / 7
घामोळ्या आलेल्या भागात चंदन पावडर आणि गुलाब जल एकत्र करून त्यांचा लेप लावावा. यामुळेही त्या भागातली जळजळ, आग थांबेल.
6 / 7
घामोळ्या आलेल्या भागात कच्चं दूध लावल्यानेही आराम पडतो.
7 / 7
कोरफडीचे एक पान मधोमध कापा आणि त्याचा लेप अलगदपणे घामोळ्या आलेल्या भागावर लावा. कोरफडीच्या थंडाव्यामुळे तिथे होणारा दाह- जळजळ कमी होईल.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसुंदर गृहनियोजनसमर स्पेशल