1 / 6Holi Celebration 2024: होळीचा रंग नखांमध्ये अडकून बसला की पुढचे काही दिवस तो लवकर निघतच नाही. त्यामुळे मग रंग खेळून झाल्यानंतर नखं खूपच खराब दिसू लागतात.2 / 6रंग खेळायला जाण्यापुर्वी आपण त्वचेची, केसांची व्यवस्थित काळजी घेतो. पण त्याचवेळी नखांकडे मात्र दुर्लक्ष होतं. त्यामुळे मग नखांवरचा रंग नंतर जाता जात नाही.3 / 6म्हणूनच नखांमध्ये रंग अडकून बसू नये म्हणून रंग खेळण्यापुर्वी या काही टिप्स लक्षात ठेवा.4 / 6सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रंग खेळायला जाण्यापुर्वी हाताच्या आणि पायांच्या नखांवर एखादी डार्क शेडची नेलपेंट लावून घ्या. नेलपेंट लावताना ती नखांच्या कोपऱ्यात व्यवस्थित लागते आहे की नाही ते पाहा. नाहीतर मग नखांच्या कोपऱ्यात रंगांचा पक्का डाग तसाच राहातो.5 / 6नेलपेंट लावल्यानंतर नखांच्या भागात पेट्रोलियम जेली किंवा खोबरेल तेल लावून चांगली मालिश करा. यामुळे रंग थेट तुमच्या नखांवर लागणार नाही.6 / 6तिसरी गोष्ट म्हणजे रंग खेळताना वारंवार हात धुवा. यामुळे हातावरचा रंग पक्का होण्यापुर्वीच निघून जाईल. या तीन गोष्टी जर लक्षपुर्वक केल्या तर नखांवरचा रंग लगेचच निघून जाईल.