Join us
Daily Top 2 Weekly Top 5

Gudi Padwa 2026 Special Look: गुढी पाडव्याला करा मराठी थाट, ८ जबरदस्त आयडिया-शोभून दिसेल मराठमोळा राजेशाही लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 13:19 IST

1 / 8
गुढी पाडवा (Gudi Padwa 2026) हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस त्यामुळे या दिवशी अस्सल मराठमोळा साजसृंगार करण्याला विशेष महत्व आहे. (Gudi Padwa Saree Look)
2 / 8
गुढी पाडव्याला काठापदराची नऊवारी साडी नेसणं हे सर्वात लोकप्रिय निवड आहे. यामध्ये पेशवाई, मस्तानी स्टाईलची नऊवारी तुम्हाला एक राजेशाही लूक देईल. (Gudi Padwa Marathi Look)
3 / 8
जर तुम्हाला नऊवारी कठीण वाटत असेल तर भरजरी पैठणी किंवा खणाची साडी नेसून तुम्ही तुमचा लूक उठावदार करू शकता.
4 / 8
या लूकची शोभा वाढवण्यासाठी गळ्यात ठुशी, कोल्हापूरी साज किंवा कानात बुगडी, पारंपारीक नथ नक्की वापरू शकता.
5 / 8
मराठमोळा लूक मोत्याच्या नथीशिवाय अपूर्ण आहे. एक छोटीशी नथ तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य खुलवते.
6 / 8
केसांचा छान आंबाडा बांधून त्यावर मोगऱ्याच्या किंवा गुलाबाचा गजरा माळणं अत्यंत शोभून दिसते.
7 / 8
कपाळावर कुंकू, डोळ्यात काजळ आणि ओठांवर साधी लिपस्टिक असा नैसर्गिक मेकअप या सणाला अधिक खुलून दिसतो.
8 / 8
सध्या सणाची साडी खूपच ट्रेंडमध्ये आहे. गडद हिरवा, जांभळा किंवा राणी रंगाची खणाची साडी किंवा त्यावर विरूद्ध रंगाचे ब्लाऊज तुम्हाला एक स्मार्ट, पारंपारीक लूक देईल.
टॅग्स : गुढीपाडवा 2026भारतीय उत्सव-सणमेकअप टिप्सगुढीपाडवा