1 / 10हिवाळ्यात शरीराची त्वचा फार कोरडी पडते. उन्हाळ्यात आपण सतत पाणी पितो. घाम येत असतो. त्यामुळे त्वचा बाहेरून कोरडी पडत नाही. 2 / 10हिवाळ्यात पाणी कमी प्यायले जाते. त्यामुळे त्वचा कोरडी पडते. कोरडी त्वचा झोमते. त्यातून रक्तही येते. 3 / 10हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करायला छान वाटते. त्यामुळे आपण जास्त वेळ अंघोळ करतो. गरम पाण्याच्या अति वापराने शरीराची त्वचा कोरडी पडते. 4 / 10शरीराला मॉइश्चरायझर लावा. खास करून हात आणि चेहरा. चेहर्यावरची त्वचा कोरडी होऊन पांढरी पडते. त्यासाठी योग्य उपाय महत्त्वाचे.5 / 10चेहर्यासाठी खोबरेल तेल सर्वात उत्तम. तेलाने मालीश करा. असे केल्याने त्वचेला ओलावा मिळतो. 6 / 10ओठांना तूप लावा. तुपाने फुटलेले ओठ पुन्हा मऊ होतात. तसेच तोंडालाही तूप लावू शकता.7 / 10शरीराला पाण्याची गरज असते. जर पाणी प्यावेसे वाटत नसेल तर ज्यूस प्या. सतत पाणी युक्त पदार्थ पोटात जाऊ द्या.8 / 10हिवाळ्यात पायाचे तळवेही फुटतात. त्यांना कोकम तेल उगाळून लावा. पायाची त्वचा सुकून जाते. तिला पाण्यात बुडवून स्वच्छ करत राहा.9 / 10त्वचेला बेबी ऑईल लावा. त्यामध्ये गरजेची सर्व सत्वे असतात. त्यांचे काही साईड इफेक्टही नाहीत. 10 / 10चांगल्या कंपनीचे बॉडी मिस्ट वापरा. ते कोरड्या त्वचेला गरजेचा असलेला ओलावा देते.