1 / 7नरक चतुर्दशीला पहाटे उठून अभ्यंग स्नान करण्याची मजा काही वेगळीच असते. पहाटेचा मंद गारवा, उगवतीला आलेला दिवस आणि अंगाला येणारा तेलाचा, उटण्याचा सुगंध म्हणजे आहाहा..2 / 7 आता याच अभ्यंग स्नानाला आणखी जास्त प्रसन्न, आनंददायी आणि आरोग्यदायी करायचं असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये काही पदार्थ आवर्जून घाला. यामुळे तुम्हाला अजूनच फ्रेश आणि सुगंधी वाटेल.3 / 7आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं गुलाबपाणी घाला. गुलाबाचा मंद सुगंध दिवसभर जाणवेलच. पण त्यामुळे त्वचाही छान होईल.4 / 7पाण्यामध्ये थोडं मीठ किंवा एप्सम सॉल्ट घालून आंघोळ केल्यास अंगातला थकवा, आळस निघून जातो आणि फ्रेश वाटते.5 / 7टी ट्री ऑईल, लव्हेंडर ऑईल असे कोणतेही सुगंधी इसेंशियल ऑईल पाण्यात घालून आंघोळ केल्यास ते त्वचेसाठी निश्चितच अधिक लाभदायी ठरतं.6 / 7सध्या वातावरण थंड झाले आहे. त्यामुळे त्वचा कोरडी पडायला नुकतीच सुरुवात झाली आहे. अशावेळी पाण्यामध्ये जर ग्लिसरीनचे काही थेंब घालून आंघोळ केली तर त्वचा छान हायड्रेटेड आणि मॉईश्चराईज होते.7 / 7आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडा लिंबाचा रस घातल्यास आणखी फ्रेश, उत्साही वाटते. शिवाय टॅनिंगही कमी होते.