1 / 7थंडीत त्वचा डायड्रेटे़ड ठेवणे फारच जास्त गरजेचे असते. त्वचा कोरडी होऊन खराब होऊ लागते. त्यासाठी त्वचेची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. काही सोप्या कृती त्वचेची निगा राखण्यासाठी फायद्याच्या ठरतात. 2 / 7मेकअप करणे न करणे प्रत्येकीच्या आवडीवर आहे मात्र त्वचेला छान चांगल्या दर्जाचे मॉइश्चराइझर लावणे फार गरजेचे असते. त्वचा पांढरी फटक होणार नाही. 3 / 7थंडीच्या दिवसांत दुपारच्या वेळी उन्ह फार बोचरं असतं. आणि संध्याकाळी अचानक वातावरण थंड व्हायला लागल्यावर त्वचा लगेच खराब होऊ शकते. त्यामुळे उन्हात बाहेर पडताना सनस्क्रिन लावणे गरजेचे असते. 4 / 7त्वचेला जीवनसत्त्व सीची गरज असते. त्यासाठी विविध क्रिम्स मिळतात. त्यांचा वापर करा. नैसर्गिक तेलाचा वापर करा. तूप लावायचे. घरगुती उपाय करुन त्वचा छान ठेवायची. 5 / 7सकाळी उठल्यावर रात्री झोपताना चेहऱ्याला चांगले क्रिम लावायचे. तुम्ही नेहमी जे वापरता ते वापरा. फार महागातले नवीन हवे असे नाही, फक्त चांगल्या दर्जाचे असावे. त्वचेला त्या तत्वांची गरज असते. 6 / 7त्वचेसाठी मध फार चांगले असते. तसेच दुधाची साय, दही, केळी, असे काही फेसपॅक जे घरी करता येतात, त्यांचा वापर करायचा. त्वचा सुंदर राहते. 7 / 7भरपूर पाणी प्यायचे. थंडीत पाणी पिण्याचे लक्षात राहत नाही. तहान लागायचे प्रमाण कमी होते. त्यामुळे घशाला कोरड पडते, त्वचेला कोरड पडते पण ते पटकन कळत नाही. ओठ फुटतात. पाणी पित राहायचे. तहान नसली तरी पाणी प्यायचे.