1 / 6तूप खाऊन रूप येतं.. हे आपण ऐकलेलंच असतं. पण कसं हा प्रश्न असतोच.. म्हणूनच आता त्यामागचं हे सत्य पाहा..2 / 6बऱ्याचदा सेलिब्रिटींच्या मुलाखतीत आपण ऐकलेलं असतं की जान्हवी कपूर, आलिया भट, क्रिती सेनन यांच्यासारख्या अनेक सेलिब्रिटी दिवसाची सुरुवात १ ग्लास कोमट पाण्यात १ टीस्पून तूप घालून ते पाणी पिऊन करतात. आता त्याने नेमकं काय होतं ते पाहुया...3 / 6तुपामध्ये ब्युटॅरीक ॲसिड असतं. पचन क्रिया सुधारण्यासाठी त्याची खूप मदत होते. पचन क्रिया सुधारली की आपोआपच शरीरावरची सूज कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.4 / 6पोट व्यवस्थित साफ होत असेल, पचन क्रिया आणि चयापचय क्रिया व्यवस्थित असतील तर त्याचा चांगला परिणाम आपोआपच आपल्या त्वचेवर दिसून येतो. त्वचा चमकदार होते.5 / 6तुपामध्ये असणारे हेल्दी फॅट्स क्रेव्हिंग नियंत्रित ठेवतात. त्यामुळे ज्यांना वारंवार क्रेव्हिंग्स होतं त्यांनी तर हा उपाय करायलाच हवा. क्रेव्हिंग्स कमी झाले की आपोआपच वजन कमी होण्यासही मदत होते. 6 / 6ज्यांना कोलेस्टेरॉल त्रास असतो किंवा हृदयविकार असतो, त्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा उपाय करावा.