सकाळी उठल्याउठल्या अंकिता लोखंडे करते ‘ही’ एक गोष्ट, चाळिशीतही दिसते कमाल सुंदर त्याचं रहस्य
Updated:July 16, 2025 13:36 IST2025-07-16T09:28:57+5:302025-07-16T13:36:21+5:30

पवित्र रिश्ता या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे नेहमीच चर्चेत असते..
अतिशय सुंदर आणि फिट अभिनेत्रींपैकी ती एक आहे. सौंदर्य आणि फिटनेस या दोन्ही गोष्टी तिने बरोबर मेंटेन केलेल्या आहेत. त्यामुळेच तर चाळिशीची असली तरीही ती अगदी तरुण आणि आकर्षक दिसते.
यासाठी ती नेमकं काय करते, त्वचेचं सौंदर्य तिने कसं टिकवून ठेवलेलं आहे, याविषयी माहिती सांगणारा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तिने जे उपाय सांगितले आहेत त्यामुळे तिची त्वचा चमकदार, तरुण तर दिसतेच पण आरोग्यासाठीही हे उपाय खूप चांगले आहेत, असं ती सांगते.
अंकिता म्हणते की तिच्या दिवसाची सुरुवात मेथ्या आणि दालचिनी रात्रभर भिजवून ठेवलेलं ग्लासभर पाणी पिऊनच होते. यामुळे चयापचय क्रिया, पचन क्रिया अधिक चांगली होती.
यानंतर बडिशेप, जिरे, ओवा हे पदार्थ भाजून ती त्याची पावडर करून घेते. ही पावडर टाकून केलेला काढाही ती रोज सकाळी नियमितपणे पिते. यामुळे शरीर नैसर्गिकपणे डिटॉक्स होते आणि त्याचा खूप चांगला परिणाम त्वचेवर, आरोग्यावर दिसून येतो.
याप्रमाणेच रात्री झोपताना पाण्यामध्ये केशर घालून ठेवायचं आणि सकाळी ते पाणी प्यायचं असाही तिचा दिनक्रम आहे.
केशरयुक्त पाणी प्यायल्यामुळे त्वचा चमकदार होते. स्ट्रेस कमी होतो. शरीर आणि मन रिलॅक्स होते. तसेच मासिक पाळीतला त्रासही कमी होतो.