Join us
Daily Top 2 Weekly Top 5

चुकूनही चेहऱ्याला लावू नका 'हे' पदार्थ, त्वचा खराब होऊन ऐन तारुण्यातच दिसाल म्हाताऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2026 13:33 IST

1 / 6
त्वचेची काळजी घेण्यासाठी हल्ली बऱ्याच गोष्टींचा अतिरेक केला जात आहे. पण त्यामुळे बऱ्याचदा त्वचेला फायदा होण्याऐवजी नुकसानच होत आहे.
2 / 6
हे टाळायचं असेल तर त्वचेला कोणत्या प्रकारचे कॉस्मेटिक्स किंवा घरगुती पदार्थ मुळीच लावू नयेत, याविषयीची माहिती स्किन केअर एक्सपर्टनी amuktamuk या पेजवर शेअर केली आहे.
3 / 6
यातली पहिली गोष्ट म्हणजे चेहऱ्याला स्क्रबिंग करा. पण खूप खरखरीत असणारे पदार्थ त्वचेवर लावू नका. कारण त्यामुळे त्वचेचं खूप नुकसान होतं.
4 / 6
कोणत्याही प्रकारचे ॲसिड ज्यामध्ये असतील ते पदार्थ किंवा क्रिम त्वचेला लावणं टाळायला हवं. यामध्ये लिंबाचा अतिरेकी वापरही करू नये. तुम्ही सतत लिंबू त्वचेला लावलं तर त्वचेचं नक्कीच नुकसान होणार.
5 / 6
हल्ली स्किन केअर रुटीनच्या नावाखाली त्वचेवर कित्येक वेगवेगळे कॉस्मेटिक्स चोपडले जातात. त्याची खरंच काही गरज नसते. त्याचे भलतेच परिणाम त्वचेवर होऊ शकतात.
6 / 6
ज्यांना खूप सुगंध असतो ते कॉस्मेटिक्सही तुमच्या त्वचेसाठी फारसे चांगले नसतात. सुगंध असला की त्यात केमिकल्स असतात आणि ते तुमच्या त्वचेसाठी त्रासदायकही ठरतात.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसुंदर गृहनियोजनहोम रेमेडी