Join us
Daily Top 2 Weekly Top 5

थंडीमुळे चेहरा निस्तेज-काळपट झाला? रात्री झोपाताना 'हे' तेल चेहऱ्याला लावा, सकाळी ग्लो येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 15:59 IST

1 / 7
हिवाळ्याच्या दिवसांत वातावरणातील थंड हवा आणि शुष्क वातावरणामुळे त्वचा कोरडी पडू लागते. हिवाळ्याच्या दिवसांत त्वचेची खास काळजी घ्यायला हवी. कारण या वातवारणात त्वचेचं मॉईश्चर कमी होतं आणि खाज यायला लागते. (Apply Almond Oil On Face To Get Glowing Skin)
2 / 7
याव्यतिरिक्त त्वचेवर डागसुद्धा येतात. काही लोक त्वचा सुंदर, कोमल बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मॉईश्चरायजर आणि क्रिम लावतात पण याचा काही खास फायदा दिसून येत नाही. जर हिवाळ्यात तुम्हाला त्वचा कोमल हवी असेल तर तुम्ही चेहऱ्यावर बदामाचं तेल लावून झोपू शकता. सकाळी तुमची त्वचा मऊ, मुलायम , चमकदार दिसेल.(Apply Almond Oil On Face Night)
3 / 7
हिवाळ्यात त्वचेची देखभाल करण्यासाठी बदामाचे तेल गुणकारी ठरते. बदामाच्या तेलात त्वचेसाठी आवश्यक असलेले पोषक तत्व असतात. बदामाचे तेल त्वचेसाठी फायदेशीर ठरते. यात व्हिटामीन ई, व्हिटामीन ए, व्हिटामीन डी आणि ओमेगा-३ फॅटी एसिड्स असतात. यातील जिंक त्वचेला पोषण देते. बदामाच्या तेलाचे बरेच फायदे आहेत.
4 / 7
हिवाळ्याच्या दिवसांत त्वचा कोरडी पडते. बदामाचं तेल लावल्यानं त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. तसंच त्वचा दिवसभर मऊ, मुलायम राहते. त्वचेवर चमकही येते. यामुळे त्वचा फक्त आतूनच नाही तर बाहेरूनही हेल्दी राहते.
5 / 7
बदामाचे तेल त्वचेसाठी कमालीचे ठरते. हे तेल लावण्यासाठी चेहरा व्यवस्थित धुवून घ्या. बदाम तेलाचे काही थेंब आपल्या हातावर घेऊन चेहऱ्यावर लावून हलक्या हातानं मालिश करा. सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यात तुम्हाला फरक दिसून येईल.
6 / 7
हे कोमट तेल चेहऱ्यावर आणि मानेवर हलक्या हातानं लावा. बोटांचया टोकांनी गोलाकार दिशेनं 2 ते 3 मिनिटं हळूवार मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि तेल त्वचेच्या आत खोलवर जाते. डोळ्यांच्याखालील काळी वर्तुळ आणि सुरकुत्या असलेल्या भागांवर काळजीपूर्वक मसाज करा.
7 / 7
तुमची त्वचा खूप संवेदनशील किंवा तेलकट असल्यास तेल नियमित लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घ्या. म्हणजे हाताच्या कोपरावर किंवा कानामागे थोडं तेल लावून 24 तास कोणती रिएक्शन येते का ते पाहा..
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी