1 / 11१. अभिनेत्री भाग्यश्री बॉलीवूडपासून सध्या दूर असली तरी तिचं ग्लॅमर अजिबातच कमी झालेलं नाही. रिॲलिटी शो किंवा सोशल मिडिया या माध्यमातून ती नेहमीच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.2 / 11२. वयाच्या पन्नाशीच्या आसपास पोहोचलेली भाग्यश्री अजूनही एवढी फिट, सुंदर आणि ग्रेसफूल कशी काय, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच पडतो. अर्थातच सोशल मिडियावर हेल्थ, फिटनेस, डाएट याविषयीच्या वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून ती त्याचं उत्तर देतच असते.3 / 11३. आता तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला असून तिचं ब्यूटी सिक्रेट सांगितलं आहे. त्वचा, केस आणि आरोग्य या तिन्ही गोष्टींसाठी तिने सुचवलेला उपाय अतिशय परिणामकारक आहे, असं ती म्हणतेय. 4 / 11४. या व्हिडिओमध्ये तिने कोरफडीचे महत्त्व सांगितले असून तिचा नियमित वापर केल्यास सौंदर्य आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींवर कसा परिणाम होतो, याची माहिती तिने शेअर केली आहे.5 / 11५. भाग्यश्री सांगते की कोरफडीमध्ये ॲण्टीबॅक्टेरियल घटक आणि मॉईश्चरायझिंग घटक मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे ती त्वचेसाठी अतिशय उत्तम असते.6 / 11६. थंडीच्या दिवसांत त्वचेचा कोरडेपणा घालवून त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी कोरफडीचा चांगला उपयोग होतो.7 / 11७. पिगमेंटेशन आणि ॲक्ने कमी करण्यासाठीही नियमित कोरफड लावणे फायद्याचे ठरते.8 / 11८. केसांना कलरिंग केल्यानंतर त्यांच्यामध्ये एक प्रकारचा ड्रायनेस, कडकपणा दिसतो. तो कमी करून केसांना मऊ करण्यासाठी कोरफड लावावी.9 / 11९. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी कोरफड उपयुक्त ठरते.10 / 11१०. तसेच कोरफडीचे नियमित सेवन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. 11 / 11११. हे सगळे फायदे मिळविण्यासाठी कोरफडीचा कसा वापर करावा, हे देखील तिने सांगितले आहे. त्यासाठी १ टेबलस्पून कोरफडीचा गर एक ग्लास पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळावा आणि ते पाणी प्यावे.