Join us

अंगावर आलेली पुरळ गायब करणारे ५ स्क्रब, खाज-जळजळ-लाली यांची चिंताच विसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2025 18:57 IST

1 / 9
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरावर पुरळ उठून सारखी खाज सुटते. ऊन्हामध्ये गेल्यावर खाजेचे प्रमाण वाढते. जळजळ होते. चेहराच नाही तर शरीरभर असे पुरळ उठते.
2 / 9
सूर्यप्रकाश तसेच हार्मोनल बदल या कारणांमुळे पुरळ शरीरावर उठते. तसेच काही औषधांचा दुष्परिणामही असू शकतो. इतरही काही वैद्यकीय कारणे असू शकतात.
3 / 9
हे पुरळ जर बराच काळ तसेच राहीले तर, त्याचे डाग जाता जात नाहीत. ते काळे पडतात. असे होऊ नये म्हणून वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
4 / 9
काही घरगुती उपाय आहेत त्यांचाही वापर करा. विकतच्या साबणांपेक्षा हे घरगुती स्क्रब वापरून पाहा. पुरळ नक्कीच कमी होईल.
5 / 9
बाजारात कॉफीपासून तयार केलेले ब्यूटी प्रॉडक्ट्स मिळतात. ते वापरण्यापेक्षा चमचाभर कॉफी पावडर खोबरेल तेलामध्ये मिक्स करा आणि त्या मिश्रणाचा वापर करून शरीर स्क्रब करा.
6 / 9
हळद त्वचेसाठी प्रचंड औषधी असते. चमचाभर हळद, चमचाभर बेसन थोडेसे दही एकत्र करा. छान मिक्स केल्यानंतर त्याने मसाज करा. नंतर धुऊन टाका.
7 / 9
एक केळं घ्या. ते कुसकरून घ्या. त्यामध्ये चमचाभर ओटमील घाला. दोन्ही पदार्थांचे मिश्रण घट्ट होईपर्यंत मिक्स करून घ्या. नंतर चेहर्‍याला किंवा पुरळ आलेल्या इतर अवयवांवर लावा. थोडावेळ ठेऊन मग धुऊन टाका.
8 / 9
चमचाभर मध घ्या. त्यामध्ये थोडी साखर घाला. थोडे दूध घाला. ते मिश्रण छान मिक्स करा मग त्वचेवर लावा आणि मसाज करा.
9 / 9
थोड्या स्ट्रॉबेरी घ्या. त्या कुसकरून घ्या. त्यामध्ये थोडे दही घाला. छान मिक्स करून घ्या. नंतर १५ मिनिटांसाठी लावा मग धुऊन टाका.
टॅग्स : त्वचेची काळजीहोम रेमेडीब्यूटी टिप्सहेल्थ टिप्स