Join us
Daily Top 2Weekly Top 5

युवराज सिंग म्हणतो मी नव्हतोच बदलत बाळाचे डायपर, वाटलं होतं ते आपलं काम नाही, मग एक दिवस बायकोने..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2026 17:24 IST

Yuvraj Singh About His Parenting Style: बाळाचे डायपर बदलणं, त्याला दूध देणं जसं प्रत्येक बापाला सुरुवातीला जड जातं, तसंच ते युवराज सिंगलाही गेलं.. त्याचाच हा किस्सा..

ठळक मुद्देयुवराज सिंगला २ आणि ४ वर्षे या वयाची मुलं आहेत. त्याच्या मुलांसोबत त्याचा बॉण्ड अतिशय चांगला असून याचे श्रेय तो त्याच्या पत्नीला देतो.

बाळ हे काही फक्त आईचीच जबाबदारी नाही. त्यामुळे खरंतर बाळाचा सांभाळ करण्यापासून ते रोजच्या रोज त्याला काय हवं काय नको ते पाहाणं ही दोन्ही पालकांची जबाबदारी आहे. पण काही अपवाद सोडले तर असं दिसून येतं की बाळाला खाऊ, पिऊ घालणं, त्याचे डायपर बदलणं हे काम फक्त आईच करते. बाबांना ती कामं येतंही नाहीत आणि ती शिकून घ्यावीत आणि करावी म्हणून घरात कोणाचा आग्रहही नसतो. मुळात बाबांनी हे सगळं करणं अपेक्षितच नसतं. असंच काहीसं युवराज सिंगच्या बाबतीतही झालं. तो सुरुवातीला ही कामं करत नव्हता. पण नंतर त्याच्या पत्नीने त्याला काही गोष्टींची जाणीव करून दिली आणि मग तो पुर्णपणे बदलला...

 

युवराज सिंगला २ आणि ४ वर्षे या वयाची मुलं आहेत. त्याच्या मुलांसोबत त्याचा बॉण्ड अतिशय चांगला असून याचे श्रेय तो त्याच्या पत्नीला देतो. तो म्हणतो की तिने मला याची जाणीव करून दिली की मुलांचं डायपर बदलणं किंवा त्यांना दूध पाजणं, खाऊ घालणं ही केवळ कामं नाहीत.

पोट नेहमीच जड- फुगलेलं वाटतं? ५ गोष्टी चुकूनही करू नका, अपचनाचा त्रास कायमचा जाईल

तर मुलांसोबत वेळ घालविण्याची, त्यांच्याशी चांगला बॉण्ड तयार करण्याची ती एक पायरी आहे. सुरुवातीला मला ही कामं करायला नको वाटायचं. पण त्यामुळे खरोखरच मी मुलांच्या जास्त जवळ गेलो..

 

आता मी मुलांना घेऊन बाहेर फिरायला जातो, मुलांसोबत एक पिता म्हणून ज्या काही गोष्टी करतो त्या गोष्टी माझ्या पालकांसोबत मला करायला मिळायला पाहिजे होत्या असं आता वाटतं. अनेक सायकोलॉजिस्टही या गोष्टीशी सहमत आहेत. आईने पोटात बाळाला वाढवलेलं असतं.

यामी गौतमच्या सौंदर्याचं सिक्रेट- 'एक चुटकी हलदी'! तिच्यासारखं सुंदर दिसायचं तर 'या' पद्धतीने हळद लावा.. 

त्यामुळे त्यांचं नातं मुळातच घट्ट असतं. त्यासाठी आईला कोणतेही वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. पण बाबाचं मात्र तसं नसतं. अशा लहानसहान गोष्टींमधून बाळाचा आणि बाबाचा संपर्क वाढत गेला तर नक्कीच दोघांचं नातं अधिक सशक्त व्हायला मदत होते.. तेच तर युवराज सिंग सांगत आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Yuvraj Singh: Initially reluctant, wife made me realize fatherhood's joys.

Web Summary : Yuvraj Singh initially avoided childcare, thinking it wasn't his role. His wife helped him realize that changing diapers and feeding are bonding opportunities. Now, he cherishes fatherhood and regrets not having similar experiences with his own father.
टॅग्स :पालकत्वयुवराज सिंगलहान मुलं