आई होणं हा आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण पण त्याचवेळी तो सर्वात कठीण टप्पाही असतो. विशेषतः आईची नोकरी, करिअर एकीकडे आणि मन मात्र पाळण्यातल्या बाळाभोवतीच गुरफटलेलं असतं. बाळाला घरी सोडून कामासाठी बाहेर पडताना एकच प्रश्न छळतो, “आपण आपल्या बाळावर अन्याय तर करत नाहीये ना?” हाच असतो ‘मॉम गिल्ट’. हाच अनुभव नुकताच अभिनेत्री यामी गौतमने शेअर केला आहे. तिचा हक नावाचा सिनेमा सध्या प्रचंड गाजतो आहे. मात्र लहान लेकराला घरी ठेवून ती शुटिंगला जात होती(yami gautam juggling shooting and motherhood).
यामी करिअरच्या शिखरावर आहे. तिचा पती आदित्य धर त्याचा धुरंधर सिनेमा हजारो कोटी रुपये कमावतो आहे पण लेकरु घरी ठेवून आईबाबा बाहेर जातात तेव्हाचा भावनिक कोलाहल ती सांगते आहे. ती म्हणते,बाळ घरी ठेवून हकचं शूटिंग करणं केवळ थकवणारं नव्हतं, तर भौगोलिकदृष्ट्याही आव्हानात्मक होतं. रोज जवळपास २ तासांचा प्रवास मी करुन जायचे. मोठं शेड्युल होतं. मग मी काम नियोजन करुन लवकर जायचे कधी सुट्टी मागायचे. पण तरी एवढ्या लहान बाळाला घरी ठेवून जाणं कधी कधी ‘क्रूर आणि कठोर’ वाटायचं. शूटिंगवर असताना मन घरात अडकलेलं असायचं आणि घरी असताना कामाची चिंता (yami gautam juggling shooting and motherhood) सतावत राहायची. अनेकदा रात्रभर शूटिंग किंवा प्रवासाचा थकवा असतानाही, पहाटे ५ वाजताच विमान पकडून घरी पोहोचत असे, बाळाचा चेहरा पाहून ताण कमी व्हायचा.
यामी गौतमची ही गोष्ट फक्त एका सेलिब्रिटी आईची नाही, तर जगभरातील प्रत्येक वर्किंग आईची आहे. मग ती कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारी असो किंवा रोजंदारीवर काम करणारी. “आपण आपल्या बाळासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही” ही भावना प्रत्येक आईच्या मनात कुठेतरी घर करून असते. करिअर, जबाबदाऱ्या आणि मातृत्व यांचा समतोल साधताना यामीने दाखवलेली ही धडपड हेच सांगते की आई दोन्ही गोष्टी जमवते पण तिला पाठबळ मिळणं, घरच्यांचा आधार असणं हा ही तिचा हक्कच आहे.
Web Summary : Actress Yami Gautam reveals the challenges of balancing motherhood and career during the 'Haq' movie shoot. She felt guilty leaving her baby, enduring long commutes and exhaustion, a sentiment echoed by working mothers globally, highlighting the need for support.
Web Summary : 'हक' फिल्म की शूटिंग के दौरान अभिनेत्री यामी गौतम ने मातृत्व और करियर को संतुलित करने की चुनौतियों का खुलासा किया। बच्चे को छोड़ने पर अपराधबोध हुआ, लंबी यात्रा और थकान हुई, यह भावना विश्व स्तर पर कामकाजी माताओं द्वारा प्रतिध्वनित होती है, जिससे समर्थन की आवश्यकता उजागर होती है।