Lokmat Sakhi >Parenting > मसाबानं लेकीला लिहिलं पत्र, आईच्या मायेनं सांगतेय बाई असण्याची सुपरपॉवर! मातीत हात घाल बिंधास्त कारण...

मसाबानं लेकीला लिहिलं पत्र, आईच्या मायेनं सांगतेय बाई असण्याची सुपरपॉवर! मातीत हात घाल बिंधास्त कारण...

Women's Day Special Note Wrriten by Masaba Gupta To Daughter Matara : निना गुप्ताची लेक मसाबानं आपली लेक मताराला पत्र लिहिलं, निमित्त महिला दिन..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2025 18:35 IST2025-03-08T18:05:53+5:302025-03-08T18:35:38+5:30

Women's Day Special Note Wrriten by Masaba Gupta To Daughter Matara : निना गुप्ताची लेक मसाबानं आपली लेक मताराला पत्र लिहिलं, निमित्त महिला दिन..

Women's Day Special Note Wrriten by Masaba Gupta To Daughter Matara | मसाबानं लेकीला लिहिलं पत्र, आईच्या मायेनं सांगतेय बाई असण्याची सुपरपॉवर! मातीत हात घाल बिंधास्त कारण...

मसाबानं लेकीला लिहिलं पत्र, आईच्या मायेनं सांगतेय बाई असण्याची सुपरपॉवर! मातीत हात घाल बिंधास्त कारण...

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांची लेक मसाबा गुप्ता (Masaba Gupta) नुकतीच एका मुलीची आई झाली आहे. आज खास महिला दिनानिमित्त मसाबाने आपली लेक 'मतारा' हिच्यासाठी इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. ती पोस्ट (Women's Day Special) अशी आहे की जे प्रत्येक आईनं आपल्या लेकीला सांगावं. पाहावी तिच्यासाठी स्वप्न आणि आकाश कवेत घेताना मुळांना कसं धरुन राहावं याची इमोशनल भेट आहे(Women's Day Special Note Wrriten by Masaba Gupta To Daughter Matara).

'नोट्स फॉर माय मतारा' (Daughter Matara) असं म्हणत केलेल्या पोस्टमध्ये खरंच काही नोंदी आहेत. "Swipe away for Love notes to my baby girl – Women's Day is a different feeling being a girl mom. And Kailash Jeevan is, in fact, life!  असे कॅप्शन देत मसाबाने जे लिहिले ते खास आहे.

मसाबा पोस्टच्या माध्यमातून लेकीला सांगते... 

१. आजचे तंत्रज्ञान फारच पुढे गेले आहे आणि दिवसेंदिवस ते अधिक विकसित होत जाईल. तंत्रज्ञाच्या मदतीने अगदी सगळ्या गोष्टी सहजसोप्या होतील परंतु स्वतःच्या मनाला सतत जागृत ठेवा. सध्या आपण एका तंत्रज्ञान युगात जगत आहोत जिथे तंत्रज्ञान तुमचे बरेचसे विचार ठरवणार आहेत. अशा परिस्थितीत संपूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता स्वतःच्या मनाला काय वाटते याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. आपलं स्वयंपाक घर आणि अवतीभोवतीचा निसर्ग बघ, मानसिक शारीरिक स्वास्थ्य तिथंही सापडेल.

२. फक्त खऱ्या गोष्टींवरच विश्वास ठेव. खऱ्या गोष्टी या तुम्हांला या जगात फार कमी म्हणजे अगदीच हातांच्या बोटांवर मोजता येतील इतक्या कमी मिळतील, त्यामुळे नेहमी खऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवा. 

स्तनपान करणाऱ्या आईने अल्कोहोल प्यावे का? राधिका आपटेचा फोटो पाहून पडलेला व्हायरल प्रश्न...

सतत धडपडून मुलांची ढोपरं-कोपरं काळी पडली? ३ उपाय, मुलांच्या त्वचेची 'अशी' घ्या काळजी...

३. "स्त्री असणे ही एक ताकद आहे". "प्रत्येकजण स्वतःचा आयुष्यरूपी खेळ खेळतो, पण स्त्री होणे हीच खरी सुपरपॉवर आहे," 

शेवटी मसाबाने जे लिहिलं आहे त्यात ती म्हणते फॅन्सी क्रिम नको, काही प्रश्न आणि जखमा साध्या कैलास जीवननेही छान भरुन येतात.
ही नोट वाचणं हा एक सुखद वाचन अनुभव आहे.


Web Title: Women's Day Special Note Wrriten by Masaba Gupta To Daughter Matara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.