मुलांचे किशोरवय म्हणजे आयुष्यातील सर्वात संवेदनशील आणि वेगवेगळ्या बदलांचा अनुभव देणारा टप्पा. या काळात मुलं लहानपणातून बाहेर पडून मोठं होण्याच्या मार्गावर असतात. जिथे मुले शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्तरावर मोठे बदल अनुभवत असतात. या काळात मुलांना स्वतःची ओळख निर्माण करायची असते, स्वातंत्र्य मिळवायचे असते आणि त्यांचे विचार महत्त्वाचे मानले जावेत असे वाटते. मात्र, अनेकदा याच वयात पालक आणि मुलांच्या नात्यात मोठा तणाव निर्माण होतो(why teenagers see parents as enemies).
अनेकदा, गोष्टी इतक्या बिघडतात की काही मुलांना त्यांचे पालक हे आपले 'शत्रू' किंवा विरोधक वाटू लागतात, जे त्यांच्या प्रगती आणि स्वातंत्र्याच्या आड येत आहेत. पालकांना मुलांवर विश्वास नसणे, सततचे नियंत्रण, वाढत्या अपेक्षा आणि संवादाचा अभाव यामुळे हे अंतर अधिक वाढण्याची शक्यता (why teens hate their parents) वाढते. परंतु, मुलांच्या मनात नेमकी कोणती कारणे दडलेली असतात ज्यामुळे ते आपल्या जन्मदात्या पालकांनाच शत्रू मानू लागतात? यामागे त्यांची मानसिक गरज, वाढते सामाजिक भान आणि (parent-teen relationship problems) पालकांच्या अपेक्षांचे ओझे यांचा कसा संबंध आहे ते पाहूयात...
पालक आणि मुलांमधील वाढता तणाव आणि अंतर...
अनेक पालकांना वाटतं, “आमचं मूल अचानक हट्टी, चिडचिडं किंवा बंडखोर का झालं?” तर दुसरीकडे मुलांना वाटतं, “आई-वडील काहीच समजून घेत नाहीत, नेहमी आदेशच देतात!” या गैरसमजामुळे घरात वाद, दुरावा आणि भावनिक ताण निर्माण होतो.
खरंतर, या वयात मुलांचा मेंदू आणि हार्मोनल बदल वेगाने होत असतात, ज्यामुळे त्यांना स्वतंत्र ओळख निर्माण करायची, निर्णय स्वतः घ्यायचे आणि जगाकडे स्वतःच्या दृष्टीने बघायचं असतं. पण पालकांची काळजी आणि नियंत्रण या दोन्ही गोष्टी त्यांना 'बंधन' वाटतात.
आजीआजोबांच्या सहवासात वाढलेल्या मुलांमध्ये असतात ६ गुण! मायेसोबतच मिळते जीवाभावाची मैत्रीही...
इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये, पॅरेंटिंग कोच पुष्पा शर्मा सांगतात की, १५ ते १८ वर्षांची मुले अनेकदा पालकांना आपले शत्रू समजू लागतात. खरंतर, यामागे एक मोठे कारण असते ते म्हणजे, ज्या गोष्टी पालकांनी फक्त एक किंवा दोन वेळा सांगायला पाहिजे, त्याच गोष्टी ते दिवसभर पुन्हा पुन्हा बोलत राहतात. पालकांची हीच सवय मुलांना त्रासदायक वाटू लागते.
पॅरेंटिंग कोच पुढे सांगतात की, पालकांकडे जीवनाचे खूप अनुभव असतात. याच कारणामुळे, त्यांना असे वाटते की त्यांनी मुलांना प्रत्येक गोष्ट शिकवावी. त्यांना काही आठवताच, ते मुलांना ती गोष्ट समजावून सांगू लागतात आणि जर मुलांनी ऐकले नाही, तर तीच गोष्ट वारंवार बोलू लागतात.
पुष्पा शर्मा म्हणतात की, पालकांच्या या सवयीला मुले 'काळजी घेणे' नाही, तर 'चिडवणे' समजतात. त्यांना असे वाटते की पालकांचा त्यांच्या मॅच्युरिटीवर विश्वास नाही आहे. याचा परिणाम असा होतो की, मुले फक्त भावनिकदृष्ट्याच नाही, तर शारीरिकदृष्ट्याही पालकांपासून अंतर ठेवून वागायला लागतात. अशा परिस्थितीत पालकांना हे समजून घेणे आवश्यक आहे की मुलांना समजावणे गरजेचे असते. पण तीच गोष्ट वारंवार बोलणे किंवा मुलांना सांगणे योग्य नाही. शांतपणे आणि स्पष्ट पद्धतीने समजावून सांगा, जेणेकरून मूल स्वतःहून शिकू शकेल.
कोणतीही गोष्ट किंवा एखादी सवय जी मुलांना शिकवायची असेल, ती शांतपणे आणि प्रेमाने एक किंवा दोन वेळा समजावून सांगा. त्यानंतर, त्या गोष्टीचे नैसर्गिक परिणाम त्याला स्वतःहून अनुभवायला द्या. पालकांनी या पद्धतीचा वापर केल्यास मुलांच्या वागणुकीत नक्कीच बदल दिसेल.