वय वाढू लागलं की, मुलांमध्ये आपल्याला बदल जाणवायला लागतात.(parenting tips in Marathi) शाळा, क्लास आणि घरातील वातावरणामध्ये मुलांचा विकास होत असतो. शाळेत किंवा क्लासेसमध्ये मुलांचे मित्र बनतात.(how to make kids listen to parents) ज्यामुळे त्यांना आपल्याच वयाच कुणीतरी सोबत आहे, समजून घेत अशी भावना कायम त्यांच्या मनात असते.(communication tips for parents and children ) आपल्या मुलांना चांगल्या सुखसुविधा देता याव्या म्हणून आई-वडील नोकरीचा विचार करतात. पण कामाच्या व्यापामुळे पालकांचे बरेचदा मुलांकडे दुर्लक्ष होते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पालकांची कसरत सुरु असते.(why children argue with parents) त्यामुळे मुलांना त्यांना हवा तसा वेळ देता येत नाही. मुलं किशोरावस्थेत आल्यानंतर त्यांना बऱ्यापैकी गोष्टी समजतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यात आपल्याला फरक देखील जाणवू लागतो. (parent child relationship advice)
या काळात आई-वडिलांपेक्षा त्यांना त्याचे मित्र अधिक जवळचे वाटतात. त्यांच्याबद्दल काही चुकीचे ऐकून घ्यायला देखील ते तयार नसतात.(family bonding tips) मुलांनी वाईट किंवा चुकीची संगत निवडली असेल तर पालक त्यांना समजवण्याचा अट्टाहास करतात पण यामुळे त्यांच्यात भांडण देखील होतात.(emotional connection with kids) यामुळे मुलांच्या अभ्यासावरच नाही तर मानसिकतेवर देखील परिणाम होतो. अशावेळी मुलं काय करतात? पालकांशी कसे वागतात जाणून घेऊया.
हिवाळ्यात रामबाण आहे पेरु! फक्त 'या' वेळी खा, सर्दी-खोकल्यापासून मिळेल आराम
1. अनेकदा मुलं मित्रांमुळे पालकांशी, आपल्या शिक्षकांशी खोटे बोलतात. ते आपल्या मुलांना चुकीच्या गोष्टी करण्यासाठी देखील दबाव आणतात. पालकांना मुलांच्या वागण्या-बोलण्यात फरक जाणवायला लागला की, त्यांच्याकडे अधिक लक्ष द्या.
2. जर मुलांची संगत वाईट असेल तर त्यांचे मित्र कायम त्यांना चांगले काम करण्यापासून रोखतात. पण अनेकदा मित्र पालकांचे आणि शिक्षकांचे ऐकू नको असं देखील सांगतात. त्यासाठी मुलांनी देखील लक्षात ठेवायला हवं. खरे मित्र चांगल्या कामात कधीच रोखत नाहीत. ते आपल्या योग्य मार्गावर चालण्यास सांगतात.
3. मुलांनी कायम लक्षात ठेवायला हवं. खरे आणि चांगले मित्र हे पालकांसह त्यांच्या मैत्रीचा देखील आदर करतात. ते आपल्याला आपल्या पालकांविषयी काहीही चुकीच सांगत नाही. त्यांच्याविषयी वाईट बोलत नाहीत.
4. अनेकदा मुलांना जवळच्या मित्रांकडून धमकी मिळते. तु माझं ऐकलं नाहीस तर मी तुझ्याशी बोलणार नाही. त्यामुळे मुलांच मन दुखावले जाते. त्यांना मानसिक त्रास होतो. अशावेळी पालकांनी योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळायला हवी.
5. मुलांचे असे अनेक मित्र असतात जे तोंडावर गोड आणि पाठीमागे नावे ठेवणारी असतात. ते मित्र कधीच खरे नसतात. पालकांनी आपलं मूल कोणासोबत आहे, कुठे जाते किंवा त्याचे मित्र कोण याची पारख करायला हवी. काही चांगल्या वाईट गोष्टी त्यांना प्रेमाने समजवून सांगायला हव्या.
