Lokmat Sakhi >Parenting > जगभरात जपानी मुलं आहेत सर्वात फिट आणि सडपताळ, पाहा त्याचं सिक्रेट! मुलांमधल्या लठ्ठपणाचं सुटेल कोड

जगभरात जपानी मुलं आहेत सर्वात फिट आणि सडपताळ, पाहा त्याचं सिक्रेट! मुलांमधल्या लठ्ठपणाचं सुटेल कोड

Why Japanese People Are Not Obese?: खूप कमी जपानी लोक लठ्ठ असतात. याचं रहस्य त्यांनी लहानपणापासून जोपासलेल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये आहेत...(fitness secret of japanese people)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2024 01:28 PM2024-05-20T13:28:01+5:302024-05-20T16:53:35+5:30

Why Japanese People Are Not Obese?: खूप कमी जपानी लोक लठ्ठ असतात. याचं रहस्य त्यांनी लहानपणापासून जोपासलेल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये आहेत...(fitness secret of japanese people)

Why japanese people are not obese? fitness secret of japanese people  | जगभरात जपानी मुलं आहेत सर्वात फिट आणि सडपताळ, पाहा त्याचं सिक्रेट! मुलांमधल्या लठ्ठपणाचं सुटेल कोड

जगभरात जपानी मुलं आहेत सर्वात फिट आणि सडपताळ, पाहा त्याचं सिक्रेट! मुलांमधल्या लठ्ठपणाचं सुटेल कोड

Highlightsपौष्टिक पदार्थांमुळेच त्यांची पचनक्रिया, चयापचय क्रिया उत्तम राहते. मेहनती तर ते लोक असतातच. याचा एकत्रित परिणाम होऊन त्यांची अंगकाठी स्लिमट्रीम असते, असं म्हटलं जातं.

कामातली चिकाटी, खूप मेहनत घेऊन काम करणे हे जपानी लोकांचे वैशिष्ट्य असते. कामाच्या बाबतीत ते लोक अजिबात हयगय करत नाहीत. त्यामुळेच ते जगभर मेहनती म्हणूनच ओळखले जातात. याशिवाय आणखी एका गोष्टीमुळे त्यांची जगभरात ओळख आहे. ती गोष्ट म्हणजे इतर देशांच्या तुलनेत जपानमध्ये जाडजूड किंवा लठ्ठ या प्रकारात मोडणाऱ्या लोकांची संख्या खूपच कमी आहे. तेथील लठ्ठ लोकांचे प्रमाण हे केवळ ४.५ टक्के आहे (Why japanese people are not obese?). हेच प्रमाण इंग्लंडमध्ये २६ टक्के तर अमेरिकेत ४० टक्क्यांच्याही पुढे आहे. त्यामुळेच जपानी लोक एवढे फिट कसे, ते लठ्ठ का होत नाहीत, असा प्रश्न त्यांच्या बाबतीत बऱ्याच लोकांना पडतो... बघा त्याविषयीचीच एक खास माहिती....(fitness secret of japnese people)

 

जपानी लोक, त्यांची आहारपद्धती, लहानपणापासून ते त्यांच्या मुलांना खाण्यापिण्याविषयी लावत असलेल्या सवची याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये असं सांगितलं आहे की जपानी लोक खाण्यापिण्याच्या सवयींबाबत अतिशय काटेकोर आहेत.

जेवताना फक्त ३ गोष्टींची काळजी घ्या- ब्लड प्रेशर वाढण्याचं टेन्शन विसरा, वाचा डॉक्टरांचा सल्ला

आपल्याकडच्या मुलांना कोणते पदार्थ आवडतात, असा प्रश्न जर विचारला तर बहुतांश मुलं त्यांच्या आवडीच्या पदार्थांमध्ये जंकफूडचं नाव घेतील. पण जपानमध्ये मात्र हाच प्रश्न विचारला तर तिथली ५ ते १८ या वयोगटातली मुलं मात्र ब्रोकोली, भात, सीवीड अशा पदार्थांची नावे घेतात.

 

तिथे लहानपणापासूनच मुलांना पौष्टिक पदार्थ खाण्याची सवय लावली जाते आणि त्या पदार्थांवर प्रेम करण्याचं शिकवलं जातं. हेच खाण्यापिण्याचे संस्कार त्यांच्यावर लहानपणापासून झाल्यामुळे तेच पदार्थ खाण्याची त्यांना सवय लागते.

बारीक होण्याच्या नादात झटपट वेटलॉस करणं पडेल महागात, वाचा ICMR चे वजन घटविण्याचे सोपे नियम

अशा पौष्टिक पदार्थांमुळेच त्यांची पचनक्रिया, चयापचय क्रिया उत्तम राहते. मेहनती तर ते लोक असतातच. याचा एकत्रित परिणाम होऊन त्यांची अंगकाठी स्लिमट्रीम असते, असं म्हटलं जातं. तर काही लोकांची मतं याविरुद्ध आहेत. त्यांच्यामते जपानी लोक मुळातच स्लिम असतात. त्यामुळे अनुवंशिकता हे त्यांच्या स्लिम असण्याचं कारण आहे.

 

Web Title: Why japanese people are not obese? fitness secret of japanese people 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.