Join us

मुलांची उंची वाढत नाही म्हणून चिंता वाटते? डाॅक्टर सांगतात मुलं उंच होण्यासाठी त्यांना....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2025 17:27 IST

Why Girls Height Increases More Quickly Than Boys: योग्य वय झालं तरी मुलांची उंची का वाढत नाही, अशी चिंता बऱ्याच पालकांना असते. बघा डाॅक्टर याविषयी काय सांगत आहेत..(How Girls Boys Height Increase Pattern Is Different?)

ठळक मुद्देतुमच्या मुलाची उंची त्याच्या वयाच्या मुलींच्या तुलनेत कमी असेल किंवा पटकन वाढत नसेल तर चिंता करू नका.

उंची हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. साहजिकच उंच लोकांची एक वेगळीच छाप समाेरच्या व्यक्तीवर पडत असते. अर्थात ठेंगण्या व्यक्ती त्यांच्या उंचीमुळे कुठे मागे पडतात असं मुळीच नाही. पण त्यांच्या मनात त्यांच्या उंचीविषयी एक न्यूनगंड असतो आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. असं आपल्या मुलांच्या बाबतीत होऊ नये असं अनेक पालकांना वाटतं. त्यामुळे मुलांचं एक ठराविक वय झाल्यानंतरही जेव्हा त्याची उंची वाढत नाही, पण त्या तुलनेत त्याच्या बरोबरीच्या मुली मात्र छान उंचपुऱ्या होऊन जातात तेव्हा मुलाच्या पालकांची चिंता आणखी वाढते (why girls height increases more quickly than boys?). तुम्हीही अशीच चिंता करत असाल तर डॉक्टरांनी दिलेला सल्ला एकदा वाचाच...(How Girls Boys Height Increase Pattern Is Different?)

 

मुलांची आणि मुलींची उंची वाढण्यामध्ये काय फरक असतो?

सारख्या वयाचे असले तरी मुलींची उंची पटकन वाढते आणि मुलांची उंची मात्र तशीच राहाते, असं आपण आपल्या आसपासच्या अनेक उदाहरणांमधून नेहमीच पाहात असतो. असं का होतं असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर डॉक्टरांनी gritzoindia या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. 

केस वाढणंच बंद झालं? करा 'हा' उपाय, केस वाढतील भराभर- महिनाभरातच दिसेल फरक 

यामध्ये डॉक्टर असं सांगत आहेत की मुलांची आणि मुलींची उंची वाढण्यात नैसर्गिकरित्याच काही बदल असतात. म्हणजेच मुलींना मासिक पाळी सुरू होण्याच्या आधीच त्यांची बऱ्यापैकी वाढ झालेली असते. उंची वाढलेली असते. जेव्हा मासिक पाळी सुरू होऊन इस्ट्रोजीन हा हार्मोन त्यांच्या शरीरात स्त्रवू लागतो तेव्हा त्यांची उंची वाढणं खूप हळूवार होऊन नंतर काही दिवसांत बंद होतं.

 

पण असं मुलांच्या बाबतीत नसतं. मुलं थोडी उशिरा वयात येतात आणि मुलांच्या बाबतीत असं असतं की प्रोजेस्टेरॉन हार्मोनमुळे १६- १७ व्या वर्षीपर्यंत त्यांची उंची वाढत जाते.

काेण म्हणतं जवसाची चटणी खमंग होत नाही? 'हा' पदार्थ घालून करा, तोंडाला मस्त चव येईल

त्यामुळे जर तुमच्या मुलाची उंची त्याच्या वयाच्या मुलींच्या तुलनेत कमी असेल किंवा पटकन वाढत नसेल तर चिंता करू नका. मुलांना सकस आहार द्या. पौष्टिक पदार्थ खाऊ घाला आणि खेळ किंवा व्यायाम यांच्या स्वरुपात त्यांच्या शारिरीक हालचाली भरपूर होतील याकडे लक्ष द्या असं डॉक्टर सांगतात. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं