लहान मुलांच्या वाढीमध्ये अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची उंची. प्रत्येक पालकाला आपल्या मुलाची उंची चांगली असावी असे वाटते. पण बऱ्याचदा काही मुलांची उंची त्यांच्या वयानुसार वाढत नाही. मुलांची उंची वाढत नाही म्हणून आपल्यापैकी कित्येक पालक या गोष्टीचे फारच(symptoms of vitamin deficiency affecting height) टेंन्शन घेतात. मुलांची उंची वाढत नाही म्हणून कित्येक (vitamin deficiency causes short height) पालक, उंची वाढवण्यासाठी असंख्य उपाय करून पाहतात. खरंतर, मुलांची उंची वाढणे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे की कौटुंबिक जनुके, पालकांची उंची, पोषण आणि बालपणीचे आजार. यापैकी पोषण हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, ज्यावर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते. योग्य पोषण आणि जीवनसत्त्वे मुलांच्या हाडांच्या आणि स्नायूंच्या वाढीसाठी मदत करतात आणि यामुळेच उंची योग्य पद्धतीने वाढते(which vitamin deficiency causes symptoms & treatment short height).
योग्य वयोमानानुसार, मुलांची उंची न वाढण्याची अनेक कारणं असू शकतात. मुलांची उंची न वाढण्यामागे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या शरीरात काही विशिष्ट जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता असणे. उंची वाढवण्यासाठी शरीराला योग्य पोषण मिळणे खूप आवश्यक असते. काही जीवनसत्त्वे अशी आहेत, जी हाडांची आणि स्नायूंची योग्य वाढ होण्यासाठी मदत करतात. मुलांची उंची वाढवण्यासाठी जर काही उपाय करायचा विचार करत असाल तर सर्वात आधी मुलांच्या शरीरात कोणत्या जीवनसत्त्वांची कमतरता आहे ते तपासून पाहिले पाहिजे. मुलांची उंची कशी वाढवावी, उंची वाढवण्यासाठी कोणती जीवनसत्त्वे मदत करतात आणि २० वर्षांनंतर उंची वाढू शकते का ते पाहूयात...
१. उंची नेमकी कशी वाढते ?
मुलांच्या उंचीची वाढ प्रामुख्याने अनुवांशिकता, पोषण आणि हार्मोन्सवर अवलंबून असते. मुलांमध्ये वाढीचे मुख्य टप्पे तीन असतात: बालपण (infancy), शाळापूर्व काळ (preschool) आणि पौगंडावस्था (puberty). मुलींमध्ये पौगंडावस्था साधारणपणे ९ ते १२ वर्षांच्या दरम्यान सुरू होते, तर मुलांमध्ये ती १२ ते १५ वर्षांच्या दरम्यान सुरू होते. उंची वाढण्यात जरी अनुवांशिकता महत्त्वाची भूमिका बजावत असली, तरी योग्य पोषणामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात. तसेच, उंची वाढीच्या हार्मोन्सना चालना मिळते, ज्यामुळे उंची वाढण्यास मदत होऊ शकते.
मुलांची उंची वाढवण्यासाठी कोणते व्हिटामिन महत्वाचे आहेत ?
१. व्हिटामिन 'D' :- उंची वाढवण्यासाठी व्हिटॅमिन 'डी' हे सर्वात महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे. हे हाडे मजबूत करण्यासाठी आणि उंची वाढवण्यासाठी प्रमुख भूमिका बजावते. व्हिटॅमिन 'डी' शरीरात कॅल्शियमचे शोषण करण्यास मदत करते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. व्हिटॅमिन 'डी' चे नैसर्गिक स्त्रोत म्हणजे सूर्यप्रकाश, दूध आणि कॉड लिव्हर ऑइल. याशिवाय, ते पूरक आहारातून देखील घेतले जाऊ शकते. व्हिटॅमिन 'डी' च्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ शकतात आणि उंची वाढण्यात अडथळा येऊ शकतो. म्हणून, हाडांच्या वाढीसाठी आणि उंची वाढवण्यासाठी पुरेसे व्हिटॅमिन 'डी' घेणे खूप आवश्यक असते.
२. व्हिटामिन 'ए' :- व्हिटामिन 'ए' पेशींच्या वाढीमध्ये आणि दुरुस्तीमध्ये (cell growth and repair) महत्त्वाची भूमिका बजावते. हे हाडांच्या आणि स्नायूंच्या वाढीच्या प्रक्रियेला मदत करते. व्हिटॅमिन 'ए' चे उत्तम स्रोत म्हणजे गाजर, पपई आणि हिरव्या पालेभाज्या. पुरेसे व्हिटॅमिन 'ए' घेतल्याने हाडांची वाढ आणि पेशींची दुरुस्ती सुधारते.
३. व्हिटॅमिन 'सी' :- व्हिटामिन 'सी' हाडांसाठी कोलेजन तयार करण्यास मदत करते. कोलेजन हे हाडांची रचना आणि वाढीसाठी अत्यंत आवश्यक असलेले एक प्रथिन (protein) आहे. तुम्ही संत्र, लिंबू, स्ट्रॉबेरी आणि सिमला मिरची यांसारख्या पदार्थांमधून व्हिटामिन 'सी' मिळवू शकता. व्हिटामिन 'सी' हाडांना मजबूत ठेवते आणि उंची वाढण्यास मदत करते.
४. व्हिटामिन 'के' :- व्हिटामिन 'के' (Vitamin K) हाडांच्या मजबुतीसाठी मदत करते आणि कॅल्शियमला हाडांमध्ये योग्य प्रकारे पुरवण्यास मदत करते. पालक, ब्रोकोली आणि आंबवलेले पदार्थ (fermented foods) हे व्हिटामिन 'के' चे चांगले स्रोत आहेत. याशिवाय, व्हिटामिन 'के' व्हिटामिन 'डी' सोबत मिळून हाडांना अधिक मजबूत बनवते.
५. व्हिटामिन 'बी' कॉम्प्लेक्स :- व्हिटामिन बी कॉम्प्लेक्समध्ये बी१२ (B12) आणि इतर बी जीवनसत्त्वांचा (B vitamins) समावेश असतो. हे पेशींच्या चयापचय क्रियेत ऊर्जा निर्मितीमध्ये (energy production) आणि वाढीमध्ये मदत करतात. हाडे आणि स्नायूंच्या वाढीच्या प्रक्रियेसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. मांस, मासे, दुग्धजन्य पदार्थ, अंडी आणि तृणधान्ये आशा पदार्थांतून व्हिटामिन 'बी' कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात मिळते.
वयाच्या विसाव्यावर्षांनंतर उंची वाढू शकते का?
२० वर्षांनंतर हाडांची लांबी वाढणे कठीण असते, कारण या वयापर्यंत ग्रोथ प्लेट्स (Epiphyseal Plates) जवळजवळ बंद झालेल्या असतात. पण याचा अर्थ असा नाही की उंची वाढवणे पूर्णपणे अशक्य आहे. योग्य आसन (posture), स्ट्रेचिंग (stretching) आणि फिटनेस व्यायाम यांच्या मदतीने उंची वाढल्यासारखा आभास निर्माण करता येऊ शकतो. योगा आणि पिलेट्स यांसारखे व्यायाम हाडे आणि पाठीच्या कण्याला लांब आणि मजबूत बनवण्यास मदत करतात. याशिवाय, योग्य पोषण आणि निरोगी लाईफस्टाईलचा वापर केल्यास पाठीचा कणा आणि शरीराची उभे राहण्याची पद्धत सुधारून उंची अधिक चांगली दिसू शकते.
कोणते पदार्थ खाल्ल्याने उंची वाढते ?
१. दूध आणि दुग्धजन्य डेअरी प्रॉडक्टस
२. अंडी आणि मासे
३. हिरव्या पालेभाज्या
४. सुकामेवा आणि सीड्स
५. विटामिन 'सी' युक्त फळे.