लहान बाळांच्या झोपेची वेळ ही त्याच्या सर्वांगीण विकास आणि एकूणच वाढीसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते. बाळाची झोप ही केवळ त्याच्या शारीरिक वाढीसाठीच नव्हे, तर त्याच्या मेंदूच्या विकासासाठीही अत्यंत महत्त्वाची असते. परंतु आपल्यापैकी प्रत्येक नव्या पालकांना एक प्रश्न नेहमीच पडतो तो म्हणजे, लहान बाळाने कोणत्या पोझिशनमध्ये झोपावे किंवा बाळांसाठी झोपण्याची कोणती स्थिती सर्वात उत्तम असते. चुकीची स्लीपिंग पोझिशन काहीवेळा बाळासाठी धोकादायक ठरू शकते, विशेषतः श्वसनप्रक्रियेवर आणि शरीराच्या विविध अवयवांवर त्याचा मोठा परिणाम होतो. इतकेच नाही तर चुकीची स्लीपिंग पोझिशन काहीवेळा वेगवेगळ्या गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकते(baby sleeping position recommended by pediatrician).
यासाठीच, आपल्या लहान बाळाला नेमकं कोणत्या पोझिशनमध्ये झोपवावे याबद्दलची योग्य माहिती नव्या पालकांना असणे गरजेचे असते. सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टर रवी मलिक यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी लहान बाळांसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या स्लीपिंग पोझिशन्स, त्यांचे फायदे - तोटे आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी सुचवलेली (best sleeping position for babies) सर्वोत्तम व सुरक्षित स्थिती कोणती आहे, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
बाळाला झोपवण्यासाठी कोणती पोझिशन सर्वात उत्तम आहे?
बालरोगतज्ज्ञ डॉक्टर रवि मलिक यांनी सांगितल्यानुसार, बाळांना नेहमी पाठीवर (Back Sleeping Position) झोपवावे. बाळांसाठी ही स्थिती सर्वात सुरक्षित मानली जाते, कारण पाठीवर झोपल्यामुळे बाळाची श्वासोच्छ्वास करण्याची प्रक्रिया उत्तम पद्धतीने होते.
या गोष्टींची काळजी घ्या...
बाळाला नेहमी अशा गादीवर झोपवा जी जास्त मऊ किंवा खूप कडक देखील नसेल. बाळासाठी उशीचा वापर अजिबात करू नका. नवजात आणि लहान मुलांची मान खूप नाजूक असते, त्यामुळे त्यांच्यासाठी सपाट पृष्ठभागावर झोपणेच सुरक्षित असते. बाळाच्या आजूबाजूला कोणतेही खेळणे, उशी, सॉफ्ट टॉय किंवा जाडजूड चादरी, ब्लॅंकेट नसावे. झोपेत असताना या वस्तू चुकून बाळाच्या चेहऱ्यावर आदळू शकतात आणि त्यामुळे त्याला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.
नवजात बाळाला किती वेळ उन्हांत ठेवावं? ९०% पालक करतात मोठी चूक - म्हणून बाळाला होऊ शकतो त्रास...
बाळाला कोणत्या स्थितीत झोपवू नये?
डॉक्टर रवी मलिक सांगतात की, बाळाला कधीही पोटावर झोपवू नये. या पद्धतीने झोपल्यास बाळाच्या श्वसनात अडथळा येऊ शकतो. यामुळे काहीवेळा SIDS (Sudden Infant Death Syndrome) चा धोका वाढू शकतो, म्हणून, बाळाला पोटावर झोपवणे पूर्णपणे टाळले पाहिजे.
PCOS असताना वेटलॉस करणे होते कठीण! डेली रुटीनमध्ये करा फक्त ५ बदल - वजन उतरेल झरझर...
बाळाला टमी टाइम म्हणजेच (पोटावर पालथं घालून खेळायला देणे) तेव्हाच द्यावा, जेव्हा बाळ जागे असेल आणि आई - वडिलांच्या देखरेखीखाली असेल. दिवसातून २ ते ३ वेळा टमी टाइम दिल्याने बाळाच्या मान, पाठ आणि खांद्यांच्या स्नायूंना बळकटी मिळते. परंतु हे लक्षात ठेवा की, देखरेखीशिवाय बाळाला पोटावर पालथं घालून ठेवू नये.
