प्रत्येक पालकांची अशी इच्छा असते की, आपल्या मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ उत्तम व्हावी. यासाठी आपण मुलांना हेल्दी पदार्थ आणि पौष्टिक आहार आहार देतो. जेव्हा हेल्दी पदार्थांचा विषय येतो, तेव्हा ड्रायफ्रूट्स हा मुलांसाठी एक उत्तम पर्याय मानला जातो. आपण शक्यतो मुलांना बदाम आणि अक्रोड यांसारखे ड्रायफ्रुट्स खायला देतो, कारण ते त्यांच्या मेंदूच्या आणि हाडांच्या विकासासाठी आवश्यक असतात. मात्र, बालरोगतज्ज्ञांच्या मते, या दोन ड्राय फ्रूट्ससोबतच आणखी एक पदार्थ आहे, जो मुलांसाठी सुपरफूड मानला जातो, ते म्हणजे मखाणे...बदाम, अक्रोड यांसारख्या ड्रायफ्रूट्सप्रमाणेच मखाणेही मुलांच्या आरोग्यासाठी तितकेच फायदेशीर असतात(best dry fruits for child development).
मखाणे, ज्याला 'लोटस सीड्स' असेही म्हणतात, ते कॅल्शियम, प्रोटीन आणि मिनरल्सचा उत्तम खजिना आहेत. मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, हाडे मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या संपूर्ण विकासासाठी मखाणे अत्यंत (Which dry fruit is best for baby brain development) फायदेशीर आहेत. मखाणे मुलांच्या आहारात का महत्त्वाचे आहेत आणि ते त्यांना कसे खायला द्यावेत ते पाहूयात...
मुलांना ड्रायफ्रूट्ससोबतच खायला द्या पांढरेशुभ्र मखाणे...
खरंतर, बालरोगतज्ज्ञ मुलांना मखाणे खायला देण्याचा सल्ला देतात. मखाणे खाल्ल्याने मुलांना एकाच वेळी अनेक फायदे मिळू शकतात.
१. कॅल्शियम मिळते :- मखाण्यांमध्ये, कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळेच मुलांची हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत होते. ज्या मुलांना सुरुवातीपासूनच कॅल्शियमयुक्त पदार्थ दिले जातात, त्यांच्या हाडांचा विकास चांगला होतो आणि भविष्यात त्यांना हाडांशी संबंधित समस्या कमी होतात.
२. प्रोटीनचा उत्तम स्रोत :- बालरोगतज्ज्ञ सांगतात की, मखाण्यांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असते. प्रोटीन मुलांच्या शारीरिक विकासासाठी तसेच स्नायू आणि उतींच्या निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असते. मखाणे खाल्ल्याने मुलांची वाढ अधिक चांगली होऊ शकते.
मुलं आईबाबांशी खोटं का बोलतात, गोष्टी का लपवतात? ५ गोष्टी करा, मुलांचं वागणं काही दिवसात बदलेल...
मुलांना न मारता - ओरडता लागेल अभ्यासाची गोडी! ५ टिप्स - मुलं स्वतःहून अभ्यास करतील भराभर...
३. पचनासाठी फायदेशीर :- मखाण्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक जास्त असते. फायबरमुळे मुलांची पचनसंस्था मजबूत होण्यास मदत मिळते. इतकेच नाही तर बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून बचाव केला जातो. जेव्हा लहान नवजात बालक घन आहार घ्यायला सुरुवात करते, तेव्हा त्यांच्या आहारात फायबर असणे खूप महत्त्वाचे असते. अशावेळी देखील मखाणा एक उत्कृष्ट पर्याय ठरतो.
४. रोगप्रतिकारशक्ती वाढते :- या सर्व फायद्यांव्यतिरिक्त, डॉक्टर सांगतात की, मखाण्यांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. यामुळे मूल वारंवार आजारी पडत नाही आणि सर्दी-खोकला यांसारख्या आजारांपासूनही बचाव होतो.
लहान मुलांना मखाणे कसे खायला द्यावेत?
बालरोगतज्ज्ञ सांगतात की, जेव्हा मूल ६ महिन्याचे होईल, तेव्हा आपण त्याला मखाणे हलके भाजून त्याची बारीक पावडर बनवून देऊ शकता आणि ती पावडर मुलाच्या पुडिंग किंवा खिचडीमध्ये मिसळून देऊ शकता. जसजसे मूल मोठे होते आणि चावायला शिकते, तसतसे तुम्ही त्याला हलके भाजलेले मखाणे स्नॅक म्हणून देऊ शकता. मखाणा हे एक स्वस्त, चविष्ट आणि हेल्दी सुपरफूड आहे, जे मुलांच्या वाढीसाठी, हाडांच्या मजबुतीसाठी आणि पचनासाठी अत्यंत फायदेशीर आहे. बदाम-अक्रोडसारखे महागडे नसतानाही, ते पोषणाच्या बाबतीत कोणापेक्षा कमी नाही.त्यामुळे, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मुलांसाठी हेल्दी स्नॅकचा विचार कराल, तेव्हा त्यांच्या आहारात माखाण्यांचा समावेश नक्की करा.