Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Parenting > मुलांना प्रेमानं विचारा ६ प्रश्न, कळेल त्यांच्या मनात काय चाललंय - त्यांनाही वाटेल आईबाबांचा आदर...

मुलांना प्रेमानं विचारा ६ प्रश्न, कळेल त्यांच्या मनात काय चाललंय - त्यांनाही वाटेल आईबाबांचा आदर...

what to ask your child before bed parenting coach shares 6 important question : what to ask your child before bed : questions parents should ask children daily : मुलांच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल, तर आई - बाबांनी रात्री झोपण्यापूर्वी त्यांना विचारायला हवेत ६ प्रश्न...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2026 20:05 IST2026-01-10T20:05:30+5:302026-01-10T20:05:30+5:30

what to ask your child before bed parenting coach shares 6 important question : what to ask your child before bed : questions parents should ask children daily : मुलांच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल, तर आई - बाबांनी रात्री झोपण्यापूर्वी त्यांना विचारायला हवेत ६ प्रश्न...

what to ask your child before bed parenting coach shares 6 important question what to ask your child before bed questions parents should ask children daily | मुलांना प्रेमानं विचारा ६ प्रश्न, कळेल त्यांच्या मनात काय चाललंय - त्यांनाही वाटेल आईबाबांचा आदर...

मुलांना प्रेमानं विचारा ६ प्रश्न, कळेल त्यांच्या मनात काय चाललंय - त्यांनाही वाटेल आईबाबांचा आदर...

दिवसभराची धावपळ, शाळा, ऑफिस आणि घरकाम यात अनेकदा पालकांचा मुलांशी संवाद फक्त 'अभ्यास झाला का?' किंवा 'जेवण केलं का?' इथपर्यंतच मर्यादित राहतो. मात्र, मुलांच्या मनात नक्की काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वीची वेळ ही सर्वात महत्त्वाची असते. ही ती वेळ असते जेव्हा मुलं शांत असतात आणि मोकळेपणाने बोलण्याच्या मनस्थितीत असतात. रात्री झोपण्यापूर्वी विचारलेले फक्त ६ छोटे प्रश्न तुमच्या मुलाचा आत्मविश्वास वाढवू शकतात आणि तुमच्यातील नातं अधिक घट्ट करू शकतात. हे प्रश्न कोणते आणि ते का विचारावेत...(what to ask your child before bed parenting coach shares 6 important question).

शाळा, अभ्यास, मोबाईल आणि टीव्ही यांच्या गर्दीत अनेकदा मुलांच्या मनातील भावना, विचार आणि दिवसात घडलेल्या गोष्टी पालकांपर्यंत पोहोचत नाहीत. मात्र रात्री झोपण्यापूर्वीचे काही मिनिटे ही पालक-मुलांमधील नातं अधिक घट्ट करण्यासाठी सर्वात योग्य वेळ ठरू शकतात. या वेळी प्रेमाने, शांतपणे मुलांशी संवाद (what to ask your child before bed) साधल्यास त्यांना आपलेपणा, सुरक्षिततेची भावना आणि आत्मविश्वास मिळतो. 

झोपण्यापूर्वी मुलांना काही साधे पण अर्थपूर्ण प्रश्न विचारल्याने त्यांचा दिवस कसा गेला, त्यांना काय आनंद दिला किंवा काय त्रास झाला हे पालकांना समजू शकते. यामुळे मुलं मनमोकळेपणाने बोलू लागतात आणि पालकांवर त्यांचा विश्वास वाढतो. या लेखात आपण असे ६ महत्त्वाचे प्रश्न जाणून घेणार आहोत, जे दररोज रात्री विचारल्यास पालक-मुलांमधील नातं अधिक प्रेमळ, मजबूत आणि समजूतदार होण्यास नक्कीच मदत होते. प्रसिद्ध पॅरेंटिंग कोच (questions parents should ask children daily) संदीप यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक अत्यंत महत्त्वाची पोस्ट शेअर केली आहे.

पालकांनी रात्री झोपण्यापूर्वी मुलांना कोणते ६ प्रश्न आवर्जून विचारावेत... 

प्रश्न १ :- आज तुला कोणत्या गोष्टीमुळे सर्वात जास्त आनंद झाला?

हा प्रश्न मुलाला आयुष्यातील छोट्या-छोट्या सुखांकडे लक्ष द्यायला आणि ती ओळखायला शिकवतो. अनेकदा आपण मोठ्या यशातच आनंद शोधतो, पण हा प्रश्न विचारल्यामुळे मुलाला हे समजते की, आनंद नेहमी मोठ्या गोष्टींतूनच मिळतो असे नाही, तर दिवसभरातील लहान पण चांगल्या अनुभवांतूनही तो मिळू शकतो. यामुळे मुलाची विचार करण्याची पद्धत सकारात्मक होते. दिवसाच्या शेवटी वाईट गोष्टींऐवजी चांगल्या गोष्टी आठवल्यामुळे मुलाचे मन प्रसन्न राहते. मुल अधिक आनंदी राहू लागते आणि आयुष्यातील साध्या गोष्टींबद्दलही कृतज्ञता व्यक्त करायला शिकते.

प्रश्न २ :- आज शाळेत किंवा दिवसभरात काही अडचण आली का? आणि आली असेल, तर तू ती कशी हाताळली?

हा प्रश्न मुलांना आयुष्यातील आव्हानांचा सामना करायला शिकवतो. जेव्हा पालक हा प्रश्न विचारतात, तेव्हा मुलाला जाणवते की चुका होणे किंवा संकटे येणे ही काही वाईट गोष्ट नाही, तर त्यातून मार्ग काढणे आणि शिकणे जास्त महत्त्वाचे आहे.

मीठाशिवाय जेवणाला चव नाहीच, पण पाहा मिठाचे ८ अजून जादूई उपयोग-आजवर नसतील माहिती...

प्रश्न ३ :- आज तुला कोणी मदत केली का? किंवा तू कोणाची मदत केलीस का?

हा प्रश्न मुलांमध्ये दयाळूपणा आणि सहानुभूती यांसारख्या मानवी मूल्यांची रुजवण करतो. जेव्हा मुलं या प्रश्नाचं उत्तर देतात, तेव्हा त्यांना जाणीव होते की आपण समाजाचा एक भाग आहोत आणि एकमेकांना साथ देणं किती महत्त्वाचं आहे. दुसऱ्यांना मदत केल्यावर मिळणारा आनंद किती मोठा असतो, हे मुलाला समजू लागते. जर कोणी आपली मदत केली असेल, तर त्याबद्दल 'धन्यवाद' म्हणणे आणि कृतज्ञ राहणे किती गरजेचे आहे, हे मूल शिकते. यामुळे मुलाचा स्वभाव मनमिळावू होतो आणि तो इतरांच्या भावनांचा आदर करायला शिकतो.

प्रश्न ४ :- आज दिवसभरात अशी कोणती गोष्ट होती जी तुला अजिबात आवडली नाही?

हा प्रश्न मुलाला त्याच्या मनातील नकारात्मक भावना दाबून ठेवण्याऐवजी त्या मोकळेपणाने व्यक्त करायला शिकवतो. अनेकदा मुलं भीतीपोटी किंवा दडपणाखाली त्यांच्या आवडी-निवडी सांगत नाहीत, पण या प्रश्नामुळे त्यांच्या मनावरचा ताण हलका होतो. मुलाच्या मनात कोणत्याही गोष्टीबद्दल भीती किंवा दबाव राहत नाही, कारण त्याला माहीत असते की आपले पालक आपले ऐकून घेतील. जेव्हा मुलं त्यांच्या मनातील 'नापसंती' व्यक्त करतात, तेव्हा त्यांना भावनिकदृष्ट्या सुरक्षित वाटते, ज्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य उत्तम राहते.

आईबाबा विसरू नका, ' या ' ५ प्रसंगी मुलांवर चिडू नका - ओरडू नका! चूक त्यांची नाही तुमची होईल कारण...

प्रश्न ५ :-  "आज तुला स्वतःचा अभिमान वाटेल अशी कोणती गोष्ट तू केलीस?

हा प्रश्न मुलाचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. जेव्हा मुलं स्वतःच्या कर्तृत्वाचा विचार करतात, तेव्हा त्यांना स्वतःमधील चांगल्या गुणांची आणि कौशल्यांची जाणीव होते. मुल स्वतःला कमी लेखण्याऐवजी स्वतःला महत्त्व द्यायला आणि स्वतःवर प्रेम करायला शिकते. जेव्हा मुलाला जाणवते की त्याच्या एखाद्या चांगल्या कृतीचे कौतुक होत आहे, तेव्हा तो अशा चांगल्या गोष्टी वारंवार करण्यासाठी प्रोत्साहित होतो.

प्रश्न ६ :- उद्यासाठी तुझं काय नियोजन आहे? उद्या तुला कोणती चांगली गोष्ट करायला आवडेल?

हा प्रश्न मुलामध्ये गोष्टींचे नियोजन करण्याची सवय लावतो. जेव्हा मुल उद्याच्या दिवसाचा विचार करते, तेव्हा त्याला आपल्या जबाबदारीची जाणीव होऊ लागते. मुल केवळ आजमध्ये न जगता उद्याचा विचार करायला शिकते, ज्यामुळे त्याची शिस्त वाढते. स्वतःचे छोटे-छोटे प्लॅन्स तयार केल्यामुळे मुलामध्ये 'मी हे करू शकतो' ही जबाबदारीची भावना निर्माण होते. उद्या काहीतरी 'चांगले' करण्याच्या विचाराने मुलामध्ये सकारात्मक उत्साह निर्माण होतो.


Web Title : रिश्ते मजबूत करें: बच्चों से सोने से पहले ये 6 सवाल पूछें।

Web Summary : बच्चों से रात को सोने से पहले छह सवाल पूछकर माता-पिता-बच्चे के रिश्ते को मजबूत करें। ये आत्मविश्वास, खुला संचार और सुरक्षा की भावना को बढ़ावा देते हैं। विषयों में दैनिक खुशियाँ, चुनौतियाँ, दयालुता के कार्य, नापसंद, उपलब्धियाँ और भविष्य की योजनाएँ शामिल हैं, जो भावनात्मक कल्याण और आपसी समझ को बढ़ावा देते हैं।

Web Title : Strengthen bonds: Ask these 6 questions before sleep for kids.

Web Summary : Strengthen parent-child relationships by asking six nightly questions. These foster confidence, open communication, and a sense of security. Topics include daily joys, challenges, acts of kindness, dislikes, accomplishments, and future plans, promoting emotional well-being and mutual understanding.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.