Join us

आईबाबाही करतात भेदभाव, मुलीपेक्षा मुलाला देतात जास्त सोयी! ‘सन प्रेफरन्स‘ तुमच्या घरातही आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2025 16:20 IST

What Is 'son Meta Preference' : मुलगा मुलगी समान म्हणतानाही मुलांना झुकतं माप देण्याचा कल आजही दिसतोच.

मुलगी शिकली, प्रगती झाली. मुलगी जगवा मुलगी शिकवा.(What Is 'Son Preference' ?) असे विचार भारतात आता प्रगतच नाही तर सामान्य माणसांच्याही विचाराच्या टप्प्यात आले आहेत. गावागावांतून मुली शिकून नोकऱ्या करतात. स्वत:चे व्यवसाय चालवतात. दहावीपर्यंत तरी मुली नक्की शिकतात. अर्थात काही ठिकाणी आजही स्त्री शिक्षणाला विरोध आहेच. पण अशा समाज कंठकांची संख्या आता आधीच्या काळापेक्षा फार कमी आहे.(What Is 'Son Preference' ?) आमचा मुलगा शाळेत जातो आणि आमची मुलगीही. आम्ही स्त्री-पुरूष समानता मानतो, असं सांगणारा पालक वर्ग खरच तसा वागतो का? अनेक अशा गोष्टी असतात ज्याची आपल्याला कल्पनाच नसते. असाच एक प्रकार म्हणजे सन मेटा प्रेफरन्स.(What Is 'Son Preference' ?) या बद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. आपण विविध मार्गांनी पैसे वाचवायचा प्रयत्न करत असतो. पण मग एखादा मार्ग भेदभावाचा असेल तर? मग काय करणार?

 सरकारी शाळांचा पट अगदी ढसाळला आहे. पालक खाजगी शाळांना प्राधान्य देतात. बऱ्याच सरकारी शाळा बंद झाल्या. काही  बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र गेल्या काही वर्षात अचानक सरकारी शाळेतील पट संख्या थोड्या फरकाने वाढली. त्यामुळे काही सरकारी शाळा बंद होण्यापासून वाचल्या. शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. आजही सरकारी शाळांमध्ये मुलींचीच संख्या जास्त आहे. आपण म्हणू मुलींची संख्या जास्त आहे म्हणजे मुलींना शिकवण्याची पालकांना इच्छा आहे. ही तर फार चांगली गोष्ट आहे. पण मुळात तसे नसून, मुलींच्या पट संख्येत झालेल्या वाढीचं कारण काही वेगळंच आहे. ते कारण म्हणजे सन मेटा प्रेफरन्स.

सन मेटा प्रेफरन्स म्हणजे काय?ज्या कुटुंबात मुलगा पण आहे आणि मुलगी पण आहे. अशा कुटुंबातील पालक मुलींना सरकारी शाळेत भरती करतात. मात्र मुलाला सरकारी नाही तर, त्याला खाजगी शाळेत भरती करतात. असं केल्याने मुलगी कमी खर्चात शिकते. आणि मुलासाठी भरपूर पैसे वापरता येतात. सरकारी शाळांचे शुल्क फारच कमी आहे. त्यात मुलींसाठी वेगळी सुट. खाजगी शाळा मात्र लाखांच्या खाली बोलतच नाहीत. सरकारी शाळांचा ढासळलेला दर्जा आणि खाजगीमध्ये मिळणाऱ्या संधींमुळे पालक पाल्याला खाजगी शाळेत भरती करतात. पण मग दोन्ही मुलांचा एवढा खर्च नको करायला म्हणून मुलाला प्राधान्य देतात. 

या विचारात समानता आहे का? असा प्रश्न पडतो. सलोनी खन्ना भारतीय कुटुंबांच्या मानसिकतेबद्दल सांगतात,"पालक असा विचार कसा करु शकतात?. दिल्लीमध्ये हा विचार करणारी मंडळी जास्त आहेत. मुली शाळेत जातात ही झाली सकारात्मक बाजू. पण मग  हा भेदभाव आणि प्राधान्याचा खेळ फारच चुकीचा आहे. असे प्रकार ऐकल्यावर पालक स्वत:च्या मुला-मुलींमध्ये भेदभाव करतात का? आसा प्रश्न उद्भवतो.              

 

टॅग्स :पालकत्वशिक्षण