Lokmat Sakhi >Parenting > मुलांच्या लहरीवर आईबाबाही स्वार! पाहा जेलीफिश पॅरेण्टिंगचा नवाच ट्रेंड- मुलांसाठी पोषक की घातक...

मुलांच्या लहरीवर आईबाबाही स्वार! पाहा जेलीफिश पॅरेण्टिंगचा नवाच ट्रेंड- मुलांसाठी पोषक की घातक...

What Is Jellyfish Parenting Know The Advantages & Disadvantages Of This Parenting Style : Here's What You Need To Know About Jellyfish Parenting : What is jellyfish parenting and is it too much of a good thing : Jellyfish Parenting: Is this parenting style good for Indian parents : जेलीफिश पॅरेंटिंग’मध्ये पालक मुलांसाठी कोणतीही मर्यादा घालत नाहीत, जेणेकरून ते त्यांच्या अनुभवांमधून शिकतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2025 17:51 IST2025-07-10T17:47:21+5:302025-07-10T17:51:05+5:30

What Is Jellyfish Parenting Know The Advantages & Disadvantages Of This Parenting Style : Here's What You Need To Know About Jellyfish Parenting : What is jellyfish parenting and is it too much of a good thing : Jellyfish Parenting: Is this parenting style good for Indian parents : जेलीफिश पॅरेंटिंग’मध्ये पालक मुलांसाठी कोणतीही मर्यादा घालत नाहीत, जेणेकरून ते त्यांच्या अनुभवांमधून शिकतील.

What Is Jellyfish Parenting Know The Advantages & Disadvantages Of This Parenting Style Jellyfish Parenting: Is this parenting style good for Indian parents | मुलांच्या लहरीवर आईबाबाही स्वार! पाहा जेलीफिश पॅरेण्टिंगचा नवाच ट्रेंड- मुलांसाठी पोषक की घातक...

मुलांच्या लहरीवर आईबाबाही स्वार! पाहा जेलीफिश पॅरेण्टिंगचा नवाच ट्रेंड- मुलांसाठी पोषक की घातक...

प्रत्येक घरामध्ये पॅरेंटिंगची पद्धत ही वेगळी असते. प्रत्येक आई - वडील मुलांचे संगोपन आपापल्या परीने वेगवेगळ्या पद्धतीने करतात. काही पालक कडक शिस्तीवर अधिक भर देतात, तर काही मुलांना पूर्णपणे हवी तशी मोकळीक देतात. प्रत्येक पालक आपली पालकत्वाची भूमिका अगदी चोख आणि योग्य पद्धतीने निभावत (What Is Jellyfish Parenting Know The Advantages & Disadvantages Of This Parenting Style) असतात. अशातच सध्या पालकत्वाची एक नवीन पद्धत लोकप्रिय होत आहे, ती म्हणजे ‘जेलीफिश पॅरेंटिंग’ (Jellyfish Parenting). नाव जरा वेगळं वाटतं, पण यामागचा अर्थ आणि दृष्टिकोन खूपच विचार करायला लावणारा आहे( Here's What You Need To Know About Jellyfish Parenting).

‘जेलीफिश पॅरेंटिंग’ हा शब्द ऐकल्यावर (What is jellyfish parenting and is it too much of a good thing) आपल्या डोळ्यांसमोर समुद्रांतील मऊ, थोडाला सैलसर असलेला जेली फिशच आठवतो. ‘जेलीफिश पॅरेंटिंग’ ही संकल्पनाच मुळात तशीच आहे, अत्यंत सौम्य, मऊमुलायम आणि निर्बंधांविरहित वागणुकीचं प्रतिबिंब आहे. ‘जेलीफिश पॅरेंटिंग’ या प्रकारांत पालक मुलं यांच्यातील नातं हे अत्यंत सौम्य, काटेकोर नियम नसणारे तसेच हवी तशी मोकळीक देणारे असते(Jellyfish Parenting: Is this parenting style good for Indian parents).

 ‘जेलीफिश पॅरेंटिंग’ म्हणजे नेमकं काय ? 

‘जेलीफिश पॅरेंटिंग’ म्हणजे अशी संगोपनाची पद्धत, जिथे पालक मुलांना प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य देतात, कोणतीही अट, नियम किंवा विरोध न करता मुलांचे निर्णय स्वीकारतात. असे पालक अत्यंत मृदू स्वभावाचे असतात, त्यामुळे घरात शिस्तीपेक्षा मोकळं वातावरण जास्त असतं.

Parenting Tips : मुलांच्या ‘या’ ५ सवयी सांगतात त्यांची संगत चांगली आहे की वाईट! तज्ज्ञांचा सल्ला, ‘एवढं’ पाहा...

सुरुवातीला ही पद्धत मुलांना आनंददायक वाटू शकते, मात्र काही वेळेस यामुळे त्यांच्यातील जबाबदारीची जाणीव, शिस्त आणि निर्णयक्षमता कमी होऊ शकते. म्हणूनच, ही पद्धत किती योग्य आहे, हे जाणून घेणं आजच्या काळात फार गरजेचं झालं आहे. या पद्धतीतील पालक परिस्थितीनुसार वागतात, कोणतेही नियम, बंधने मुलांवर लादत नाहीत. हे पालक मुलांना हवी तशी मुभा देतात – कोणते कपडे घालायचे, किती वेळ टीव्ही पाहायचा, अभ्यासाच्या वेळा, जेवणाच्या सवयी इत्यादी सर्व गोष्टी मुलांवर सोडून देतात.

 ‘जेलीफिश पॅरेंटिंग’चे फायदे... 

१. मुलांचे आत्मभान वाढते, मुलांना स्वतःचे निर्णय घेण्याची सवय लागते.

२. स्वतंत्र विचारांची जडणघडण होते, जबरदस्ती नसल्यामुळे मुलं आपल्या पद्धतीने शिकतात.

३. पालक-मुलांमध्ये मैत्रीपूर्ण नातं निर्माण होतं. 

४. मुलं कोणताही संकोच न ठेवता भावना व्यक्त करू शकतात.

५. मुलांमधील संवाद कौशल्ये अधिक चांगली विकसित होतात.

ती तर मास्टर आहे! लेकीकडे बोट दाखवत शंभरावा विजय साजरा करणाऱ्या दमलेल्या बाबाची आनंदी गोष्ट!

 ‘जेलीफिश पॅरेंटिंग’चे तोटे... 

१. कोणतेही नियम नसेल तर मूल शिस्तीत राहायला शिकत नाही.

२. जबाबदारीची जाणीव कमी होते, नेहमीच माफ केलं जात असल्यामुळे मूल चुका गांभीर्याने घेत नाही.

३. संवेदनशीलता आणि सहनशीलता कमी होऊ शकते. प्रत्येक गोष्ट मनासारखी मिळाल्यामुळे नकार पचवण्याची क्षमता कमी होते.

४. मुलांना जबाबदाऱ्या समजणे कठीण जाते.

५. मुलांना लोकांशी कसे वागावे हे समजत नाही.

जेलीफिश पॅरेंटिंग फायदेशीर आहे  की नुकसानदायक ? 

‘जेलीफिश पॅरेंटिंग’ ही पद्धत काही प्रमाणात फायदेशीर असली, तरी ती पूर्णतः अमलात आणल्यास मुलांच्या मानसिक आणि सामाजिक विकासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी या पद्धतीच्या पॅरेंटिंगचा वापर करताना समतोल राखणं महत्त्वाचं आहे. मुलांना मोकळीक देताना योग्य मर्यादा आणि मार्गदर्शन देणं हेच यशस्वी पालकत्वाचं उत्तम सूत्र आहे.

Web Title: What Is Jellyfish Parenting Know The Advantages & Disadvantages Of This Parenting Style Jellyfish Parenting: Is this parenting style good for Indian parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.