मुलांना कसं वाढवावं हा प्रत्येक पालकासमोरचा प्रश्न असतो आणि प्रत्येक पालक तो आपापल्या परीने सोडवत असतो. काही पालक मुलांना खूप समजुतीने घेतात. मुलांचे लाड करतात. खूप सौम्य भाषेत आणि मुलांना न रागावता त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवतात. या स्टाईलला जेंटल पॅरेंटिंगही म्हटलं जातं. त्याउलट काही पालक असतात जे मुलांना कडक शिस्तीत ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण आता मात्र या दोन्ही प्रकारांपेक्षा खूप वेगळं असणारं पॅरेंटिंग गाजत आहे आणि ते आहे FAFO पॅरेंटिंग (new trend of FAFO parenting). आता हा कोणता नवा प्रकार आणि त्यात पालक आणि मुलं असं काय वेगळं करतात ते पाहा...(what is FAFO parenting?)
FAFO पॅरेंटिंग म्हणजे काय?
जेंटल पॅरेंटिंगमध्ये जर मुलांनी एखादी गोष्ट ऐकली नाही तर पालक त्यांना ती खूप प्रेमाने हळूवारपणे समजावून सांगतात. मुलांनी आपलं म्हणणं ऐकावं म्हणून त्यांनी मनधरणीही करतात. मग प्रसंगी मुलांनी चीडचीड केली तरी ती सहन करतात. याच उलट तर कडक शिस्तीचे पालक असतील तर ते मुलांना आपलं म्हणणं कसंही करून ऐकायलाच लावतात.
पण FAFO पॅरेंटिंग करणारे जे पालक आहेत ते मुलांनी काही ऐकावं म्हणून फार मागे लागत नाहीत. मुलांना काय करायचं ते करू देतात. मुलं अनुभवातून किंवा एखादी ठेस लागल्यावर त्यातून आपोआप शिकत जातात. उदा. मुलांना अभ्यासाची सक्ती करायची नाही किंवा त्यांची मनधरणीही करायची नाही. आपोआप परीक्षेत कमी गूण मिळतात आणि मग शिक्षक रागावल्यानंतर त्या धाकाने मुलं स्वत:हून धडा घेऊन अभ्यासाला लागतात, अशी ही पॅरेंटिंग स्टाईल आहे.
मागच्या काही वर्षांत पॅरेटिंगचा ट्रेण्ड खूप बदलला. मुलांशी मित्रत्वाचे वागावं हा ट्रेण्ड रुजला. पण या पिढीतली जी मुलं आता मोठी झाली आहेत, ती मुलं मानसिकदृष्ट्या अजिबात खंबीर नाहीत.
आता जिरेही उरले नाहीत खरे! बाजारात आलेत सिमेंटचं आवरण असलेले जिरे, फोडणीचा जीवघेणा ठसका
बाहेरची वादळं ती पेलू शकत नाहीत. त्यांची निर्णयक्षमता कमी पडते. प्रत्येक ठिकाणी त्यांना पालकांची गरज भासते, असा काहींचा अनुभव आहे. त्यामुळे आता FAFO पॅरेंटिंग हा नवा ट्रेण्ड आला आहे आणि अनेकांना तो खूप उपयुक्त वाटत आहे. काही दिवस हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही.
