Join us

जेहने 'ही' चूक करताच रागावली आई, करिना म्हणाली- 'मी सांगितलं ना तुला...'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2025 20:03 IST

Vial Video Of Kareena Kapoor Scolds Her Son Jeh : सगळी मुलं सारखीच असतात... आपली मुलं जे करतात तेच सेलिब्रिटींची मुलंही करतात. करिना कपूरचा मुलगा जेह सुद्धा त्यातलाच.. त्याचाच हा एक मजेशीर किस्सा..(Vial Video Of Kareena Kapoor Scolds Jeh)

ठळक मुद्देया प्रसंगामुळे सोशल मीडियावर मोठाच गोंधळ उडाला आहे. करिनाने मुलाला अशा पद्धतीने रागावायला नको असं काही म्हणत आहेत.

सेलिब्रिटींना आपण नेहमीच मोठ्या पडद्यावर, छोट्या पडद्यावर पाहात असतो. त्यांच्या अवतीभोवतीचं ग्लॅमर एवढं मोठं असतं की ते सुद्धा आपल्यासारखेच असतात हे आपण विसरून जातो. तेच त्यांच्या मुलांचंही आहे. त्यात करिना कपूर आणि सैफ अली खानसारख्या सुपरस्टार पालकांची मुलं असतील तर त्यांच्या भोवतीचं ग्लॅमरचं वलय आणखी मोठं.. त्यामुळे आपण त्या मुलांकडे नेहमी सेलिब्रिटींची मुलं याच चष्म्यातून पाहातो. त्यामुळे ती सुद्धा आपल्या मुलांसारखीच खोडकर, निरागस, मस्तीखोर, धिंगाणा घालणारी आणि कधी कधी पालकांचं न ऐकणारीही असू शकतात, असं आपल्याला वाटतच नाही. पण शेवटी मुलं ती मुलंच.. मग ती एखाद्या सामान्य घरातली असो किंवा मग अगदी सैफ- करिनाचे जेह आणि तैमूर असो.. तेही कधीकधी चुकतात आणि आई म्हणून करिनाला त्यांना ओरडावंच लागतं.. त्याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे..(Vial Video Of Kareena Kapoor Scolds Her Son Jeh)

 

त्या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की करिना तिच्या दोन्ही मुलांसह म्हणजेच जेह आणि तैमूर यांच्यासह मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया या भागात आलेली आहे. यावेळी तिच्या अवतीभोवती अनेक माणसं उभी असून ती त्यांच्याशी बोलत आहे.

खमंग पिठल्याचे झणझणीत प्रकार- शेवग्याच्या शेंगांचं पिठलं, दाण्याच्या कुटाचं पिठलं आणि बरंच काही...

आता सर्वसामान्य पालक जेव्हा मुलांना बाहेर घेऊन जातात आणि कोणाशी तरी बोलण्यात किंवा इतर काही कामात दंग होतात तेव्हा त्यांची मुलंही नकळतपणे त्यांचा हात सोडून देतात. तेच छोट्या जेहने सुद्धा केलं. जेहने त्याच्याकडे लक्ष देणाऱ्या ताईंचा हात सोडला आहे हे लक्षात येताच करिना बोलता बोलता अचानक खाली वाकते आणि जेहला "I said hold your hand'  असं सुनावते. आई म्हणून तिला काळजी वाटणं आणि तिने त्याला रागावणं अगदी साहजिक आहे.

 

पण या प्रसंगामुळे सोशल मीडियावर मोठाच गोंधळ उडाला आहे. करिनाने मुलाला अशा पद्धतीने रागावायला नको असं काही म्हणत आहेत.

दोन फरशांमधला गॅप खूप काळपट दिसतो? २ उपाय- घाण स्वच्छ होऊन फरशा होतील चकाचक

पण तिने जे केलं ते योग्यच आहे आणि प्रत्येक आईला कधी ना कधी असं करावंच लागतं असं बहुतांश लोकांनी कमेंट करत करिनाची बाजू उचलून धरली आहे. खरंतर कोणतीही आई जे करेल तेच करिनाने केलं. त्यातच सैफवर हल्ला झाल्याचा जो प्रसंग घडला त्यानंतर ती मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत जास्त जागरुक झाली आहे. त्यामुळे तिने केलं त्यात काहीही चूक नाही.. तुम्हाला काय वाटतं? हा व्हायरल व्हिडीओ पाहा आणि तुम्हीच ठरवा.. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंकरिना कपूरसैफ अली खान तैमुर