मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा घरातले सदस्य त्याच्याकडे मोठ्या उत्सूकतेने पाहतात. कोणी बाळाचे डोळे बघतात तर कोणी बाळाचे नाक बघते.. बाळाला बारकाईने पाहिलं की लगेच घरच्या मंडळींची चर्चा सुरू होते की बाळ नेमकं कोणावर गेलं आहे.. त्याच्या आईवर गेलं आहे की बाबांवर गेलं आहे.. कोणाला ते आईसारखं वाटतं तर कोणाला बाबांसारखं.. पुढे बाळ जसं जसं मोठं होत जातं तसं तसं बाळाचा चेहरा, स्वभाव, गूण बदलत जातात. पण तरीही काही अभ्यासानुसार असं सांगण्यात आलेलं आहे की बाळाच्या काही गोष्टी अगदी हुबेहूब त्याच्या आईसारख्या असतात तर काही गोष्टीत बाळ पुर्णपणे वडिलांसारखं असतं. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहा...(Traits Babies Inherit From Their Father and Mother)
बाळ आईकडून आणि वडिलांकडून कोणकोणते गूण घेते?
जन्माला आलेलं मूल अनुवंशिकतेनुसार त्याच्या आईकडून आणि वडिलांकडून कोणकोणते गूण घेऊन जन्माला आलेलं असतं, याविषयीची माहिती डाॅक्टरांनी dr.dipti_payghan या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
बाळ पित्याकडून कोणते गूण घेते?
१. बाळाची उंची त्याच्या वडिलांच्या उंचीवरून बऱ्याच प्रमाण ठरते. वडील उंच असतील तर अपत्यही उंच होण्याची शक्यता जास्त असते.
कमी वयातच त्वचा सुरकुतली? २ सोपे उपाय- त्वचेची लवचिकता वाढून सुरकुत्या होतील गायब
२. असं म्हणतात की नाक, कपाळ, ओठांचा आकार या गोष्टी वडिलांसारख्या असतात.
३. केसांचं टेक्चर हे देखील वडिलांच्या केसांवरून ठरतं.
४. बाळाचा स्वभाव हा देखील बऱ्याच अंशी वडिलांच्या स्वभावासारखा असतो.
मूल आईकडून कोणते गूण घेते ?
१. बुद्धिमत्ता ही आईकडून आलेली असते असं डाॅक्टरांनी म्हटलं आहे.
२. त्याचबरोबर बाळाची शरीरयष्टी आईसारखी असण्याची शक्यता खूप जास्त असते.
३. बाळाच्या झोपेच्या सवयी बऱ्याच अंशी आईच्या झोपेच्या सवयींसारख्या असतात.
केसांसाठी घरीच तयार करा नॅचरल हेअर डाय- पांढरे केस होतील काळेभोर, चमकदार
४. याशिवाय बाळ किती ॲक्टीव, उत्साही असणार आहे, ते शांत असणार, रिलॅक्स असणार की खूप गडबड करणारं असणार हे देखील त्याच्या आईशी मिळतंजुळतं असतं.. असे काही अंदाज असले तरीही योग्य शिस्त लावून, शिकवण देऊन मुलांना आपण त्यांचे स्वभाव, बुद्धीमत्ता, झोपेच्या वेळा, एनर्जी लेव्हल या बाबतीत वेगळ्या पद्धतीनेही घडवू शकतो.
Web Summary : Babies inherit traits from both parents. Height, facial features, hair texture, and temperament often come from the father, while intelligence, body type, and sleep habits are often like the mother.
Web Summary : शिशु माता-पिता दोनों से लक्षण प्राप्त करते हैं। कद, चेहरे की विशेषताएं, बालों का रंग और स्वभाव अक्सर पिता से आते हैं, जबकि बुद्धि, शरीर का प्रकार और सोने की आदतें अक्सर माँ जैसी होती हैं।