Join us

पालक हो! तुम्ही '५' चुका कराल तर मुलं बिघडणारच म्हणून समजा; वेळीच या सवयी बदला नाहीतर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2024 11:26 IST

Top 5 mistakes while parenting : पालकांच्या 'या' सवयींमुळे मुलं बिघडतात?

प्रत्येक आई-वडिलांना आपले मुल करिअरदृष्ट्या मोठे व्हावे असे वाटते. मुलाच्या जडणघडणीत आणि योग्य संस्कार देण्यासाठी पालक विविध गोष्टी करतात (Parenting Tips). आपल्या मुलांनी चांगला अभ्यास करावा, चांगले मार्क्स मिळवावे अशी अपेक्षा प्रत्येक पालक करतो. पालक जे काही आपल्या आयुष्यात करू शकले नाही, ती प्रत्येक गोष्ट आपल्या मुलावर लादतात.

शिवाय अशा अनेक पालकांच्या गोष्टी आहेत, ज्यामुळे मुलं खचतात (Child Mental Health). असे म्हटले जाते की पालक हे आपल्या मुलाचे पहिले शिक्षक आणि आदर्श असतात. आई-वडील जे काही करतात, तेच मूलही शिकतात (Child Care). त्यामुळे पालकांनी मुलांसमोर सभ्यपणे वागायला हवे. आपल्या मुलाने चांगल्या सवयी शिकाव्यात असे वाटत असेल तर, पालकांनी '५' सवयी आजच सोडायला हवेत. यामुळे मुलं बिघडू शकतात(Top 5 mistakes while parenting).

मुलांसमोर भांडू नका

पालकांनी मुलांसमोर कधीही भांडू नये. याचा परिणाम मुलाच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर होतो. पालकांनी फक्त एकमेकांसमोर नसून, कोणाशीही वाद घालू नये. जिथे पालक भांडखोर स्वभावाचे असतात, तिथे मुलंही पालकांची ही वागणूक अंगीकारतात. त्यामुळे पालकांनी मुलांसमोर अपशब्द किंवा भांडू नये.

फॅनचा स्पीड कमी केल्याने वीजबिल कमी येते? नक्की खरं काय? वीजबिल कमी यावे म्हणून..

हात उगारू नका

बरेच पालक मुलांनी चूक केल्यावर त्यांच्यावर हात उगारतात. जे चुकीचे आहे. यामुळे मुलं मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचतात. मुलांवर हात उगारल्याने ते अधिक हट्टी होतात. कालांतराने त्यांना सुधारणे अधिक कठीण होते. त्यामुळे मुलांवर हात उगारने हाच पर्याय उरत नाही.

घरात स्वच्छता राखा

मुलांसाठी प्रथम रोल मॉडेल त्यांचे पालक असतात. जर आपण आपली खोली घाण ठेवली, अथवा साफ केली नाही तर, मुलं देखील हीच गोष्ट शिकतात आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे मुलांसमोर नेहमी घराची साफसफाई करा.

खोटं बोलू नका

मुलांसमोर कायम खोटं बोलत राहिलात तर, मुलं देखील खोटं बोलायला शिकतात. त्यामुळे मुलाला बरोबर-अयोग्य आणि सत्य आणि खोटे यातला फरक समजावून सांगा. त्यांच्यासमोर जर वारंवार खोटं बोलत राहिलात तर, मुलांना देखील खोटं बोलण्याची सवयी लागेल.

पाण्याच्या बाटल्या आतून कळकट झाल्या? कोमट पाण्याचा सोपा उपाय; काही मिनिटात दिसतील नव्यासारखे..

प्रत्येक हट्ट पूर्ण करू नका

मुलांचे प्रत्येक हट्ट पूर्ण करू नका. मुलांच्या त्याच गोष्टी पूर्ण करा, जे त्यांच्या करिअरसाठी फायदेशीर ठरतील. मुलांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे पालन करणे किंवा त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करणे योग्य नाही. यामुळे मुलं हट्टी होतात आणि बिघडतात.

टॅग्स :पालकत्वसोशल मीडियासोशल व्हायरल