Join us

बुलेटच्या वेगानं चालेल मुलांचं डोकं; मेंदू तल्लख होण्यासाठी 2 पदार्थ खायला द्या; स्मार्ट होतील मुलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 20:25 IST

2 Foods Will Make Your Kid Geniuses : पालक, ब्रोकोली, केल यांसारख्या भाज्यांमध्ये व्हिटामीन के, फॉलेट, ल्युटिन असते.

जर तुम्हाला वाटत असेल की मुलांनी अभ्यासात हूशार व्हावं आणि त्यांच्या मेंदूचा विकास वेगानं व्हावा तर खाण्यापिण्यामध्ये काही काही बदल करायला हवेत. अक्रोड आणि हिरव्या भाज्या जसं की पालक आणि ब्रोकोली मुलांची स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. याचे कमालीचे फायदे समजून घेऊ. (This 2 Foods Will Make Your Kid Geniuses Include This Green Vegetable Along With Walnuts)

अक्रोड

रिसर्चनुसार अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी एसिड्, एंटी ऑक्सिडेंट आणि व्हिटामीन ई असते, ज्यामुळे मेंदूला पोषण मिळते. मुलांची लक्ष देण्याची क्षमता सुधारते आणि मोठ्यांचीही स्मरणशक्ती सुधारते. एका संशोधनात ६ महिने अक्रोड खाल्ल्यानंतर मुलांमध्ये न्युरोसायकोलॉजीकल एक्टीव्हीजमध्ये सुधारणा झाली होती (Ref). अक्रोडमुळे बौध्दिक क्षमतेचा विकास होतो आणि  मुलं अधिकाधिक प्रगती करतात. बायोनने प्रकाशित केलेल्या अभ्यासातून असं दिसून आलं की अक्रोड मुलांमध्ये स्मरणशक्ती वाढते आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते.

हिरव्या पालेभाज्या

पालक, ब्रोकोली, केल यांसारख्या भाज्यांमध्ये व्हिटामीन के, फॉलेट, ल्युटिन असते. ज्यामुळे मेंदूचा विकास होतो आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

अक्रोड आणि हिरव्या भाज्यांमध्ये काही पोषक तत्व असतात ज्यामुळे मेंदू शांत राहतो आणि ताणतणाव चिंता कमी होण्यास मदत होते. मुलांची विचार करण्याची क्षमता वाढते याशिवाय मोठ्या वयाच्या लोकांमध्ये होणारी मानसिक क्षमता कमी होण्याचा वेग कमी होतो. सकाळच्या नाश्त्याला अक्रोड, दुपारच्या जेवणात सॅलेड किंवा सूपमध्ये पालक आणि ब्रोकोलीचा समावेश करू शकता.

फक्त अभ्यासच नाहीतर डाएटनंसुद्धा मेंदू चांगला चालतो. अक्रोड, हिरव्या पालेभाज्या, रोज खाल्ल्यानं स्मरणशक्ती चांगली राहते, मन एकाग्र होतं, मानसिक आरोग्य दीर्घकाळ चांगले राहते. मुलांसाठी ते ब्रेन पॉवर बुस्टरप्रमाणे काम करते.

टॅग्स :पालकत्व