Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Parenting > दहावी-बारावीच्या परीक्षेला जाणाऱ्या मुलांसाठी आईबाबांनी म्हणावे ‘हे’ जादूई शब्द, ताण कमी-रिझल्ट मनासारखा...

दहावी-बारावीच्या परीक्षेला जाणाऱ्या मुलांसाठी आईबाबांनी म्हणावे ‘हे’ जादूई शब्द, ताण कमी-रिझल्ट मनासारखा...

things to say to child before exam : encouraging words for students before exam : what parents should say before exam centre : परीक्षा केंद्रावर मुलांना सांगा 'या' ५ खास गोष्टी, मुलांवरील परीक्षेचा ताण हलका करण्यासाठी सोपे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2026 18:15 IST2026-02-05T17:57:32+5:302026-02-05T18:15:23+5:30

things to say to child before exam : encouraging words for students before exam : what parents should say before exam centre : परीक्षा केंद्रावर मुलांना सांगा 'या' ५ खास गोष्टी, मुलांवरील परीक्षेचा ताण हलका करण्यासाठी सोपे उपाय...

things to say to child before exam encouraging words for students before exam | दहावी-बारावीच्या परीक्षेला जाणाऱ्या मुलांसाठी आईबाबांनी म्हणावे ‘हे’ जादूई शब्द, ताण कमी-रिझल्ट मनासारखा...

दहावी-बारावीच्या परीक्षेला जाणाऱ्या मुलांसाठी आईबाबांनी म्हणावे ‘हे’ जादूई शब्द, ताण कमी-रिझल्ट मनासारखा...

परीक्षांचा मोसम म्हटलं की, केवळ विद्यार्थ्यांच्याच नाही, तर पालकांच्या मनाचीही धाकधूक वाढते. १० वी आणि १२ वीची वर्षे ही करिअरचा महत्त्वाचा टप्पा मानला  जात असल्यामुळे मुलांवर अभ्यासासोबतच गुणांच्या स्पर्धेचे आणि निकालाचे प्रचंड दडपण असते. अशावेळी मुलांच्या डोक्यात विचारांचे काहूर माजलेले असते, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या पेपरवर होऊ शकतो. या काळात अभ्यासाचा ताण, अपेक्षांचा दबाव, भवितव्याची चिंता आणि “कसं लिहू?”, “आठवेल ना?” असे अनेक प्रश्न मुलांच्या मनात घोळत असतात. यामुळे अनेकदा मुलं घाबरलेली, अस्वस्थ किंवा आत्मविश्वास गमावलेली दिसतात. अशा वेळी पालकांनी फक्त अभ्यासाबद्दल विचारण्यापेक्षा मुलांना मानसिक आधार देणं फार गरजेचं असतं(encouraging words for students before exam).

एक पालक म्हणून आपली भूमिका केवळ मुलांकडून अभ्यास करून घेणे एवढीच मर्यादित नाही, तर त्यांचा आत्मविश्वास वाढवणे ही देखील असतेच. परीक्षा केंद्राबाहेर जाताना आपल्या मुलांच्या मनात भीती नसेल तर तो अधिक चांगल्या प्रकारे पेपर लिहू शकतो. परीक्षेच्या आधी दोन शब्दांचा धीर, सकारात्मक बोलणं आणि योग्य मार्गदर्शन मुलांच्या डोक्यावरचं ( what parents should say before exam centre) मोठं टेन्शन कमी करू शकतं. विशेषतः परीक्षा केंद्राबाहेर पालकांनी मुलांना सांगितलेल्या काही साध्या पण फायदेशीर गोष्टी, त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करतात आणि परीक्षा शांत मनाने देण्यास मदत करतात. यासाठीच, आपल्या मुलांच्या डोक्यावरील ताण हलका करण्यासाठी आणि त्यांना मानसिक बळ देण्यासाठी पालकांनी (things to say to child before exam) नेमके काय करावे आणि परीक्षा केंद्राच्या गेटवर निरोप देताना कोणत्या ५ खास गोष्टी सांगाव्यात, ते पाहूयात... 

मुलांना परीक्षा केंद्राच्या गेटवर निरोप देताना कोणत्या ५ खास गोष्टी सांगाव्यात...  

१. पूर्ण पेपर लक्षपूर्वक वाचणे :- मुले अनेकदा घाईघाईत चुका करतात. अशा वेळी, जेव्हा मूल परीक्षेला जात असेल, तेव्हा त्याला सर्वात आधी आठवण करून द्या की त्याला पेपर नीट वाचायचा आहे आणि वाचण्यात कोणतीही चूक करायची नाही. मुलांना हे देखील समजावून सांगा की जे प्रश्न येतात ते आधी सोडवायचे आहेत. जेव्हा मुले लक्षपूर्वक पेपर वाचतात, तेव्हा पेपर सोडवताना वेळेचे नियोजन आपोआप होते.

२. पेपर तुझी क्षमता ठरवत नाही :- मुले परीक्षेला खूप घाबरतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्यावर चांगले गुण मिळवण्याचा प्रचंड दबाव असतो. त्यांना कमी गुण मिळण्याची किंवा नापास होण्याची भीती वाटते. परीक्षा देण्यापूर्वी तुम्ही तुमच्या मुलांना सांगितले पाहिजे की, हा पेपर तुझी क्षमता ठरवू शकत नाही आणि या परीक्षेचा निकाल जो काही असेल किंवा परीक्षेत मिळणाऱ्या गुणांपेक्षा तू मोठा आहेस. प्रामाणिकपणे प्रयत्न करणे, हाच सर्वात मोठा विजय आहे.

तुम्ही ५ गोष्टी करत नसाल तर कडक डाएट आणि भरमसाठ व्यायाम करुनही नाही होणार वेटलॉस!

३. तुझी तयारी झाली आहे, घाबरू नकोस आणि शांत राहा :- जेव्हा तुम्ही मुलांवर विश्वास दाखवाल, तेव्हाच मुलांचा स्वतःवरचा विश्वास वाढेल. अभ्यास कमी झाला असो वा जास्त, मुलाने कष्ट घेतले आहेत याची जाणीव त्यांना करून द्या. त्यांना खात्री द्या की तू जे वाचले आहेस तेच परीक्षेत येईल. भीतीपेक्षा आत्मविश्वासाने पेपर अधिक चांगला लिहिता येतो. त्यामुळे न घाबरता तुला जेवढं येतंय तेवढं समजुतीने लिही, असे आवर्जून सांगा. 

४. पेपर कसा गेला यापेक्षा तू प्रयत्न केलास, हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे :- हे वाक्य मुलांच्या मनात असलेली निकालाची भीती कमी करतं. यामुळे मुलांना हे समजतं की गुणांपेक्षा त्यांचा प्रयत्न, मेहनत आणि प्रामाणिकपणा पालकांसाठी अधिक महत्त्वाचा आहे. अपयशाची सततची चिंता दूर झाल्यामुळे मुलं अधिक शांत, सकारात्मक आणि आत्मविश्वासाने पेपर लिहू शकतात. मनावरचा ताण कमी झाल्याने आठवलेले मुद्दे नीट मांडता येतात आणि चुका होण्याची शक्यता देखील कमी होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या शब्दांमुळे मुलांना भावनिक आधार मिळतो आणि ते स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतात.

रोजच जागरण म्हणजे मरण जवळ येणंच! फार काम म्हणून रात्रीचा दिवस कराल तर आयुष्य होते कमी कारण...

५. आम्ही तुझ्यासोबत आहोत :- "निकाल काहीही असला तरी आई-बाबा माझ्यावर रागवणार नाहीत," ही जाणीव मुलांच्या मनातील भीती कमी करते, ज्यामुळे ते अधिक शांतपणे पेपर लिहू शकतात. परीक्षेच्या काळात अनेक मुलांच्या मनात 'जर मला कमी गुण मिळाले तर?' असे विचार येतात. पालकांचा पाठिंबा अशा नकारात्मक विचारांना रोखतो. जेव्हा मुलाला कळते की माझी किंमत ही केवळ कागदावरच्या मार्कांवरून ठरणार नाही, तेव्हा त्याचा स्वतःवरचा विश्वास वाढतो. पालकांशी भावनिक नाते घट्ट झाल्यामुळे, परीक्षेत एखादा पेपर कठीण गेला तरी मुले न घाबरता ते पालकांना सांगतात, ज्यामुळे मुलांचे मानसिक दडपण टळते.

परीक्षा सुरू होण्यापूर्वी पालकांनी घ्यायची काळजी... 

१. डेली रुटीन :- परीक्षेच्या दिवसात मुलांनी स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी. पण परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान २० दिवस आधीपासून त्यांना काही नियम लावावेत. मुलांनी वेळेवर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे आवश्यक आहे, जेणेकरून परीक्षेच्या दिवशी सकाळी त्यांना झोप येणार नाही.

२. मोबाईलपासून दूर ठेवा :- परीक्षेच्या काळात मुलांनी फोन वापरणे टाळावे. सतत फोन पाहिल्यामुळे एकाग्रता कमी होते आणि अभ्यासापेक्षा फोनमधील गोष्टीच जास्त लक्षात राहतात.

३. वाचन आणि रिव्हिजन :- दररोज वाचन आणि उजळणी करण्याची सवय लावा. एकाच गोष्टीची वारंवार उजळणी केल्याने स्मरणशक्ती वाढते आणि परीक्षेच्या वेळी उत्तरे विसरण्याची शक्यता कमी होते.

Web Title : 10वीं, 12वीं की परीक्षा में जाने वाले बच्चों के लिए माता-पिता के जादुई शब्द

Web Summary : परीक्षाओं के दौरान माता-पिता का समर्थन महत्वपूर्ण है। ध्यान केंद्रित करके पढ़ने के लिए प्रोत्साहित करें, परिणामों से अधिक प्रयास पर जोर दें, आत्मविश्वास बढ़ाएं और अटूट समर्थन दें। सफलता के लिए दिनचर्या को प्राथमिकता दें, फोन का उपयोग सीमित करें और लगातार पुनरीक्षण को बढ़ावा दें।

Web Title : Parents' magical words for 10th, 12th exams: Reduce stress, improve results.

Web Summary : Parents' support is crucial during exams. Encourage focused reading, emphasize effort over results, build confidence, and offer unwavering support. Prioritize routine, limit phone use, and promote consistent revision for success.